अनिल कपूर हे बॉलीवूडमधील एक एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या फिटनेस आणि लाइफस्टाइलमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्याचा फिटनेस आणि त्यांची स्टाईल आजही अनेक तरुण अभिनेत्यांना तोंडात बोटं घालायला लावतात. नुकतचं एका मुलाखतीत अनिल कपूर यांनी त्यांच्या कपड्यांबाबतचा किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘जवान’मधील विजय सेतुपतीचा जबरदस्त लूक प्रदर्शित; शाहरुख खानने पोस्ट केली शेअर

नुकतचं अनिल कपूर यांनी त्यांच्या अगामी वेबसिरीज ‘द नाइट मॅनेजर २’ च्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी सलमान खानशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. अनिल कपूर म्हणाले, “ही खूप जूनी गोष्ट आहे. त्यावेळेस मी सलमान खानबरोबर एका चित्रपटात काम करत होतो. तेव्हा एकदा माझ्या कपड्यांच बिल तिथं आले. त्या बिलमधील रक्कम खूप जास्त होती.”

अनिल कपूर पुढं म्हणाले. “हे बिल बघून सलमानला मोठा धक्का बसलेला. तो मला म्हणालेला. कपड्यांवर एवढा खर्च. एवढा खर्च तर मी माझ्या पूर्ण करिअरमध्ये कपड्यांवर केला नाही. त्यानंतर मी त्याला म्हणालो तू तसाही हॅंडसम दिसतोस. तू जीन्स आणि टीर्शटमध्येही चांगला दिसतोस. पण मला चांगले कपडे घालणे खूप गरजेचे आहे.”

हेही वाचा- Video: अजय देवगणसाठी मराठी माणूस मागतोय भीक; म्हणाला, “मी भीक मागून पैसे पाठवेन पण तू…”

अनिल कपूर यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर त्यांची ‘द नाइट मैनेजर’ बेवसिरीजचा दुसरा भाग काही दिवसांपूर्वीच हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. या वेबसिरीजमध्ये अनिल कपूर यांच्याबरोबर आदित्य रॉय कपूर, तिलोत्तमा शोमेऔर मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When salman khan was shocked to see the price of anil kapoor clothes actor revealed funny story in the kapil sharma show dpj