बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला पण ‘ब्रह्मास्त्र’ने मात्र सगळं भरून काढलं. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट झाला. त्यानंतर नुकताच आलेला ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता रणबीरचा आगामी चित्रपट ‘ॲनिमल’ हा चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्री टीझरमध्ये रणबीरची एक छोटीशी झलक पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यातील रणबीरचं पात्र आणि एकूणच कथानक यांची प्रचंड चर्चा होत आहे. वडील-मुलातील नात्याबद्दल भाष्य करणारा हा एक गँगस्टर ड्रामा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट प्रचंड हिंसेने भरलेला असेल याची कल्पना याचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी आधीच दिली होती. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता आणि ‘कबीर सिंग’पेक्षा माझा पुढील चित्रपट जास्त वादग्रस्त असेल असंही सांगितलं होतं.

आणखी वाचा : Animal Pre-teaser : कुऱ्हाडीने वार करणाऱ्या रणबीर कपूरचे हिंस्र रूप अन्…बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’चा प्री-टीझर प्रदर्शित

अनुपमा चोप्राबरोबरच्या मुलाखतीमध्ये संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटावर टीका करणाऱ्या टिकाकारांना उत्तर दिलं होतं. बऱ्याच लोकांनी ‘कबीर सिंग’ हा चित्रपट फार हिंस्र आणि प्रॉब्लेमॅटीक असल्याचं सांगितलं होतं. त्यावर बोलताना संदीप रेड्डी वांगा म्हणाले, “ही लोक कबीर सिंगला हिंस्त्र चित्रपट म्हणत आहेत. मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की हिंस्र चित्रपट नेमका कसा असतो. माझा या लोकांवर काही राग नाही, पण आता माझा पुढील चित्रपट पाहून यांची नेमकी प्रतिक्रिया पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, सौरभ शूक्लासारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. ११ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचदिवशी सनी देओल अमिषा पटेलचा ‘गदर २’, रजनीकांत यांचा ‘जेलर’ आणि अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २’ हे तीनही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When sandeep reddy wanga said animal will be more violent film than kabir singh avn