संजय कपूरने १९९५ मध्ये ‘प्रेम’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तब्बूदेखील होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पहिल्या सिनेमानंतर तीन आठवड्यांनी संजयचा ‘राजा’ रिलीज होणार होता. पहिल्या चित्रपटाच्या खराब कामगिरीमुळे अनेकांना वाटलं की संजयचं करिअर सुरू होण्याआधी संपलंय. तसेच ‘राजा’चे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनाही वाटलं की संजय कपूरमुळे चित्रपट फ्लॉप होणार आणि त्यांचं निर्माता म्हणून करिअर संपलंय. मात्र सिनेमा सुपरहिट ठरला.
इंद्र कुमार सिद्धार्थ कन्ननला म्हणाले, “दोन हिट चित्रपट दिल्यानंतर मी राजा पुन्हा शूट केला. जेव्हा मी मूळ चित्रपट पाहिला तेव्हा मला काही दृश्ये समजली नाहीत. मला माझी चूक लक्षात आली, म्हणून मी स्क्रिप्ट पुन्हा लिहून पुन्हा शूट केले. तो सिनेमाही सुपरहिट झाला.”
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
संजय कपूरचा आधीचा चित्रपट फ्लॉप झाला अन्…
पुढे ते म्हणाले, “राजा रिलीज होण्याच्या फक्त तीन आठवड्यांपूर्वी, तब्बू व संजय कपूरचा आणखी एक चित्रपट रिलीज झाला होता. पण तो फ्लॉप झाला. लोक माझी खिल्ली उडवू लागले. मीदेखील आशा गमावली होती. माझ्या मनात विचार आला, ‘इंद्र कुमार, हा तुझा शेवटचा चित्रपट समज. यानंतर हरिद्वारला जावं लागणार.’ माझ्या सिनेमाचा हिरो संजय कपूर होता, ज्याचा मागील चित्रपट फ्लॉप झाला होता, त्यामुळे सगळे त्याच्याबद्दल बोलत होते. त्याचा माझ्या चित्रपटावर वाईट परिणाम होऊ शकतो. मी आशा सोडली होती. पण, माधुरी दीक्षित, सरोज खान आणि माझ्या लेखकांचे आभार, त्यांच्यामुळे हा चित्रपट हिट झाला.”
हेही वाचा – अभिनेत्री हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न
थिएटरमधील अनुभव सांगत ते म्हणाले, “मी नॉव्हेल्टी थिएटरमध्ये चित्रपट पाहत होतो, जे लोक संजय कपूरच्या मागील चित्रपटाची खिल्ली उडवत होते, तेच लोक माधुरी दीक्षितला त्याने झापड मारल्यावर त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते.” त्या सीनबद्दल कुमार यांनी स्पष्टीकरणही दिलं. “एक सीन आहे जिथे माधुरी दीक्षित संजय कपूरच्या भावावर तिचा छळ केल्याचा आरोप करते, पण तो भावाऐवजी तिला झापड मारतो आणि आपल्या भावाची बाजू घेतो. तो तिच्यावर विश्वास ठेवण्यास नकार देतो. त्यावेळी संपूर्ण नॉव्हेल्टी थिएटरमधील प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. एवढी ताकद स्क्रिप्टमध्ये आहे,” असं ते म्हणाले.
माधुरी दीक्षितला झापड मारतानाचा संजय कपूरचा डायलॉग इंद्र कुमार यांनी सांगितला. “खबरदार जो मेरे भाई को पागल कहा और रही बात फैसले की तो सुन, तुझ जैसी १००० लड़कियां मै कुर्बान करता हु अपने भाई पे. समझी?” असा तो डायलॉग होता.
संजय कपूरचे बरेच चित्रपट हिट झाले, पण तरीही तो यशस्वी अभिनेता होऊ शकला नाही, याबाबत इंद्र कुमार व्यक्त झाले. “चित्रपट खूप यशस्वी झाला, तरी त्याचा संजय कपूरच्या करिअरला फायदा झाला नाही. मी माझ्या मुलालाही हेच सांगतो, ‘अभिनेता म्हणून तू किती चांगला आहेस या गोष्टीने काही फरक पडत नाही, हे सर्व नशिबावर अवलंबून आहे.’ माझ्या मते संजयने ‘राजा’सारख्या चित्रपटात उत्तम काम केलं होतं. पण, तरीही त्याला त्याचा फायदा झाला नाही.”
इंद्र कुमार यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी १९९० मध्ये ‘दिल’ या सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांचा ‘बेटा’ चित्रपट आला होता. हे दोन्ही चित्रपट हिट झाले होते.
© IE Online Media Services (P) Ltd