बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीच्या ‘द मदर ऑफ कोरिओग्राफी इन इंडिया’ म्हणजे सरोज खान आज या जगात नसल्या तरी त्यांचा आठवणी कायम आपल्याबरोबर आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ९० च्या दशकातील सरोज खान यांची ही मुलाखत आहे. त्यामध्ये सरोज खान यांनी, संजय दत्तचा डान्स पाहून त्या कशा प्रकारे खुर्चीवरून खाली पडल्या होत्या हा किस्सा सांगितला आहे.
सरोज खान यांनी ‘लहरी’ या वृत्तसंस्थेला दिलेली ही मुलाखत आहे. या मुलाखतीच्या सुरुवातीला सरोज खान म्हणाल्या, “ज्यांना डान्स येत नाही. किंवा डान्समुळे ज्यांना रिजेक्ट केलं जातं. अशा लोकांना डान्स शिकवताना एक वेगळीच मजा येते. बॉलीवूडमध्ये गोविंदा, अक्षय कुमार, आमिर खान यांसारखे अनेक चांगले डान्सर आहेत. पण ज्या वेळी मला संजय दत्तसारख्या डान्स येत नसलेल्या अभिनेत्याला शिकवायला सांगितलं, त्या वेळी मला त्यात अधिक मजा आली. माझ्यासाठी अशा लोकांना डान्स शिकवणं हे आव्हान होतं. जेव्हा मला ‘तम्मा तम्मा लोगे’ हे गाणं कोरिओग्राफ करण्यासाठी सांगितलं, तेव्हा मी एक अट घातली. जर संजय या गाण्यावर नियमित सराव करणार असेल, तरच मी हे गाणं कोरिओग्राफ करीन.”
हेही वाचा – Video : लग्न, किस, हूकअप… कोणाबरोबर काय करशील? आकांक्षा पुरी म्हणाली, “सलमान खानबरोबर…”
“त्यानंतर ‘ठाणेदार’ चित्रपटाच्या सेटवर माझ्याबरोबर एक प्रँक केला गेला. निर्माते एक महिन्यानंतर माझ्याकडे आले आणि बोलले की, तुम्ही हे गाणं कोरिओग्राफ करू शकणार नाहीत. तेव्हा मी विचारलं का? तर मला सांगण्यात आलं की, संजय दत्तनं अजूनपर्यंत सराव केलाच नाही. मी संजय दत्तला रोज सराव करण्यासाठी सांगितलं होतं. पण तो डान्सच्या सरावाऐवजी बॉडी बिल्डिंग करायचा. मी एकदा सेटवर रागात गेले. मी संजयला जेवढा सराव केला असशील तेवढं नाचून दाखव, असं सांगितलं. जसं गाणं सुरू झालं तसं या मुलानं संपूर्ण गाण्यावर डान्स करून दाखवला आणि मी आनंदाच्या भरात खुर्चीवरून खालीच पडले. त्यानंतर आम्ही सर्व जण या प्रँकवर खूप हसलो.”
हेही वाचा – Video: नाकाची सर्जरी झाल्यानंतर शाहरुख खान भारतात परतला; पत्नी व मुलाबरोबरचा व्हिडीओ आला समोर
शाहरुख खानबाबत सरोज खान म्हणाल्या, “शाहरुख हा जरी डान्सर नसला तरी तो खूप चांगल्या प्रकारे एखादी गोष्ट आत्मसात करतो. शाहरुखचं ‘ये काली काली ऑंखें’ हे गाणं खूप छान होतं. या गाण्यावर जेव्हा डान्स बसवला, तेव्हा मी त्याला सरावाला बोलावलं. त्या वेळेस तो म्हणाला मास्टरजी सेटवर करू. मी म्हणाले, ठीक आहे. पण जेव्हा सेटवरून येऊन त्याचा डान्स पाहिला, तेव्हा मी आश्चर्यचकित झाले. त्याने या गाण्याच्या प्रत्येक शॉटसाठी जवळपास ४० मिनिटे ते एक तास सराव केला. या गाण्यासाठी खरे तर त्याला एक पुरस्कार दिला पाहिजे होता. तो माधुरी दीक्षितचा मेल व्हर्जन आहे.”