जवळपास ४० वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे सौरभ शुक्ला हे लोकप्रिय अभिनेते आहेत. बहुतेक चित्रपटांमध्ये सहाय्यक पात्रांमध्ये झळकलेले सौरभ काही वेळा तर जबरदस्त अभिनयामुळे मुख्य अभिनेत्यांनाही मागे टाकतात. ‘बर्फी’ आणि ‘जॉली एलएलबी’ सारख्या चित्रपटात काम करून त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे. आज त्यांच्याबद्दल एक रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौरभ शुक्ला आज त्यांचा ६१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म ५ मार्च १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं झाला. मात्र, त्यांचं बालपण दिल्लीत गेलं आणि शिक्षणही इथेच झालं. ते दोन वर्षांचे होते तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झाले. त्यांनी दिल्लीच्या खालसा कॉलेजमधून शिक्षण घेतलं. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि ते १९८४ मध्ये रंगभूमीशी जोडले गेले. अभिनय हा छंद असला तरी गर्लफ्रेंडसाठी थिएटर जॉइन केले होते, असा किस्सा एकदा त्यांनी सांगितला होता.

१७ व्या वर्षी सोडलं घर, चाळीत राहून केला संघर्ष, नकारामुळे आत्महत्येचे विचार अन्…; आता….

गर्लफ्रेंडसाठी जॉइन केलेलं थिएटर

सौरभ यांनी एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती. ते थिएटरमध्ये काम करायला का आले होते, याचा खुलासा त्यांनी केला होता. ते म्हणाले होते की मी अनेकदा थिएटरसमोरून जात असे. तिथे खूप सुंदर मुली होत्या पण मुलं दिसायला तितकी चांगली नव्हती. त्यामुळे मला वाटलं की मला इथे गर्लफ्रेंड मिळू शकते, असा विचार त्यांनी केला होता. पण अभिनयाची आवड असल्याने मग सौरभ यांनी इथेच राहून अभिनय शिकून घेतला आणि याच क्षेत्रात करिअर केलं.

Video: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय; आराध्याचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “इतक्या वर्षांनी हिचं…”

‘बँडिट क्वीन’मधून करिअरची सुरुवात

सौरभ शुक्ला यांना चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी दिली होती. त्यांचा पहिला चित्रपट ‘बँडिट क्वीन’ होता. सौरभ यांनी एनएसडीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हा चित्रपट मिळाला. इथे त्यांना चार हजार रुपये मिळायचे, त्यामुळे ते दिल्लीत खूप खुश होता. इथेच एका नाटकादरम्यान त्यांची शेखर कपूरशी ओळख झाली. शेखर यांनी त्यांना ‘बँडिट क्वीन’मध्ये भूमिका मिळवून दिली आणि काम करण्याची संधी दिली. या सिनेमात काम करण्यासाठी ते पहिल्यांदाच मुंबईत आला होता. ‘सत्या’ चित्रपटातून सौरभ यांना ओळख मिळाली. यामध्ये त्यांनी ‘कल्लू मामा’ची भूमिका साकारली होती. ते या चित्रपटाचे सहलेखकही होते. त्यांनी ‘बर्फी’, ‘ओएमजी’ आणि ‘जॉली एलएलबी’ सारख्या चित्रपटातही काम केलंय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When saurabh shukla said he joined theater to find girlfriend hrc