सध्या बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याच्याविषयी बरंच उलट सुलट बोललं जात आहे. शाहरुखचा आगामी चित्रपट ‘पठाण’ हा त्यातील एका गाण्यामुळे चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर याची जबरदस्त चर्चा आहे. काही लोक शाहरुखच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तर काही शाहरुखच्या विरोधात आहेत. काही लोकांनी हा चित्रपट हिंदू विरोधी आहे असं म्हणत या चित्रपटाला बॉयकॉट करायची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकूणच सोशल मीडियावर इतका गदारोळ असताना शाहरुखची एक जुनी व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखला हिंदू आणि मुसलमान या धर्माबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला आणि त्याचं अत्यंत सुंदर उत्तर त्याने दिलं आहे. हा व्हिडिओ जुना आहे. शाहरुख आणि करण जोहर एका कार्यक्रमात सहभागी झाले होते तेव्हा शाहरुखला एका व्यक्तीने एक प्रश्न विचारला.

आणखी वाचा : जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार ३’चा पहिला कट तब्बल ९ तासांचा; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

त्या व्यक्तीने शाहरुखला विचारलं की, “जर तू हिंदू असता किंवा तुझे नाव वेगळे असते, समजा तुझे नाव शेखर कृष्ण (SK) असते, तर तुला काही फरक पडला असता का? तुला लोकांनी धर्मावरून बोलणं थांबवलं असतं का?” या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख पहिले हसत म्हणाला की “जर माझं नाव हिंदू असतं तर ते शेखर राधा कृष्णन (SRK) असं छान वाटलं असतं.”

पुढे शाहरुख म्हणाला, “माझ्यामते जर मी हिंदू असतो तर काहीच फरक पडला नसता. मला वाटतं कलाकार हा नेहमीच सामाजिक आणि धार्मिक बंधनांच्या पलीकडचा विचार करतो, त्यामुळे मला तुम्ही कोणत्याही नावाने हाक मारली असती तरी मी तितकाच गोड आणि प्रेमळ असतो असं मला वाटतं.” शाहरुखचं हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याचं कौतुक केलं. शाहरुखचा ‘पठाण’ २५ जानेवारीला चित्रपटगृहात धडकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When shah rukh khan answered if his life would have been different if he was born as hindu avn
Show comments