शाहरुख खानने त्याच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला असून तो जागतिक स्तरावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक बनला आहे. विल स्मिथ आणि दुआ लिपा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी त्याचे कौतुक केले आहे. मात्र, एक वेळ अशी होती जेव्हा शाहरुख खान बॉलीवूड सोडून दिल्लीला जाणार होता. अलीकडेच एका कार्यक्रमात शाहरुखने याची आठवण सांगितली आहे.
दुबई येथे नुकत्याच झालेल्या तिसऱ्या ग्लोबल फ्रेट समिटमध्ये शाहरुख खानने (Shah Rukh Khan) त्याच्या कारकिर्दीसह त्याच्या आयुष्यातील अनेक पैलूंबद्दल सांगितले. त्याला त्याच्या व्यवसायाबद्दल काय आश्चर्य वाटते असे विचारले असता, अभिनेत्याने सांगितले की, “दररोज झोपेतून उठल्यावर अजूनही खूप काही शिकण्यासारखे आहे हे याची जाणीव झाल्यावर मला आश्चर्य वाटते.”
हेही वाचा…आमिर खानने किरण राववर केला ‘हा’ आरोप; म्हणाला, “तिला माझ्या अभिनयावर…”
पुढे शाहरुख म्हणाला, “मी एकदा एका चित्रपटाच्या सेटवर आलो तेव्हा मला वाटले की मी सर्वोत्तम अभिनेता आहे. मी अतिआत्मविश्वासात होतो आणि मग मला समजले की, सेटवर प्रत्येकजण माझ्यापेक्षा चांगला अभिनय करत होते. यामुळे मी परत दिल्लीला जायचा निर्णय घेतला होता. मला घरी जायचे होते कारण मला समजले होते की मी खूप वाईट अभिनेता आहे. यामुळे मी विमानतळावर धाव घेतली, तिकीट घेतले आणि मुंबईहून दिल्लीला जाणार पहिल विमान पकडलं. मला आठवतं की, तेव्हा एक आंतरराष्ट्रीय फ्लाइट असायची जी २५ टक्के स्वस्त असायची कारण मला दुसऱ्या विमानाची तिकीट मला परवडत नव्हती.
हेही वाचा…अर्जुन कपूरने ‘या’ व्यक्तीसाठी खांद्यावर काढला टॅटू, फोटो शेअर करत म्हणाला, “ती माझ्यावर…”
याच मुलाखतीत शाहरुख म्हणाला, “मला अजूनही असे वाटत की जगात अजून खूप काही शिकण्यासारखं आहे. माझ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत, मी प्रत्येक वेळी सेटवर जातो तेव्हा मला जाणवते की अजून जे मला माहिती नाही अशा खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. हे मला माझ्या व्यवसायाबद्दल आश्चर्यचकित करते.”