दादासाहेब फाळके अवॉर्ड्स सोहळा मंगळवारी (२० फेब्रुवारी रोजी) पार पडला. हा सोहळ्यात शाहरुख खान, रानी मुखर्जी, आदित्य कपूर, अॅटली, करीना कपूर व शाहिद कपूर यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी व टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यातील रेड कार्पेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एकेकाळी रिलेशनशिपमध्ये राहिलेले करीना कपूर व शाहिद कपूर दिसत आहेत. शाहिद कपूर रेड कार्पेटवर उभा असतो आणि तिथे करीना कपूर येते. करीना व शाहिद दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य असते. करीना त्याच्यासमोरून जाते आणि त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला भेटते, त्यावेळी शाहिद तिच्याकडे बघत असतो. नंतर करीना तिथून निघून जाते. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांचा व्हिडीओ अनेक पापाराझी अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

“ओS मानेS याSSS”, जेव्हा विमानात शिरताच किरण मानेंना ऐकू आला आवाज; म्हणाले, “दचकून बघितलं तर…”

खरं तर शाहिद व करीनाच्या ब्रेकअपला १५ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. पण इतक्या वर्षातही हे दोघे सार्वजनिकरित्या कधीच एकमेकांना भेटताना किंवा एकमेकांशी बोलताना दिसलेले नाहीत. त्यांनी ‘उडता पंजाब’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं, पण त्यांचे एकत्र सीन नव्हते. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही ते एकमेकांशी अंतर राखून असायचे.