दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सिनेसृष्टीत सहाय्यक भूमिका साकारून करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी अनेक नकारात्मक भूमिकादेखील केल्या. १९७६ मध्ये आलेला सुभाष घई यांचा ‘कालीचरण’ हा चित्रपट शत्रुघ्न यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. यानंतर शत्रुघ्न यांना ‘विश्वनाथ’, ‘जानी दुश्मन’, ‘जमाना दिवाना’ आणि ‘दोस्ताना’ यासह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाले. चित्रपट हिट झाले आणि त्यांचा चाहतावर्गदेखील तयार झाला. शत्रुघ्न त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले.

‘एनिथिंग बट खामोश’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी रीना रॉयबरोबरचं अफेअर अन् पूनमशी लग्न यासंदर्भात एक वाक्य लिहिलं आहे. “कोणाशी लग्न करावी, ही माझ्यासाठी समस्या नव्हती, तर कोणाशी करू नये ही होती,” असं त्यांनी स्वतःच्या लग्नाबद्दल म्हटलंय.

Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
May or may not be true Yuzvendra Chahal drops cryptic insta story amid divorce rumours with Dhanashree Verma
Yuzvendra Chahal : ‘हे खरं पण…’, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान युजवेंद्र चहलने सोडले मौन, इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल
nouran aly on vivian dsena converting into islam
विवियन डिसेनाने दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारला? पत्नी म्हणाली, “आमच्या धर्मात स्त्रिया…”
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Raveena Tondon And Govinda
“…तर मी तुझ्याबरोबर लग्न केले असते”, गोविंदा व रवीना टंडनबाबत सुनिता आहुजा म्हणाल्या, “मी तिला सांगितले…”

हेही वाचा – सोनाक्षी सिन्हा तुमच्यासारखी दिसते; असं विचारल्यावर शत्रुघ्न सिन्हांची एक्स गर्लफ्रेंड रीना रॉय म्हणाल्या होत्या…

शत्रुघ्न यांचे रीना रॉय अन् पूनमबरोबरचे चित्रपट

शत्रुघ्न सिन्हा यांच्या आयुष्यातील सर्वात चर्चेतला विषय म्हणजे त्यांचं व अभिनेत्री रीना रॉय यांचं अफेअर होय. ‘कालीचरण’, ‘मिलाप’, ‘संग्राम’, ‘सत श्री अकाल’, आणि ‘चोर हो तो ऐसा’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यांनी ऑन स्क्रीन केमेस्ट्री तर कमाल होती; मात्र ऑफ स्क्रीन दोघे प्रेमात पडले. दोघांचे अफेअर सर्वश्रूत होते; असे असूनही अचानक शत्रुघ्न यांनी अभिनेत्री पूनम चंदिरामानीशी लग्न करण्याची घोषणा केली होती. या दोघांनी ‘सबक’मध्ये एकत्र काम केलं होतं आणि एका रेल्वे प्रवासात त्यांची भेट झाली होती.

हेही वाचा – “मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”

रीनाबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं?

शत्रुघ्न यांनी केलेल्या या घोषणेमुळे अनेकांना धक्का बसला होता. काही वर्षांनंतर एका मुलाखतीत याबद्दल विचारल्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या या निर्णयाबद्दल भाष्य केलं होतं. “तुमचं रीना रॉयबरोबर अफेअर होतं, मग लग्न पूनमशी का केलं? असं मुलाखतकाराने थेट विचारल्यावर शत्रुघ्न म्हणालेले, “आयुष्यात माणूस कधीतरी अशा टप्प्यावर असतो, जिथे निर्णय घेणं खूप कठीण असतं. अशावेळी जो निर्णय घेतला जातो, तो नेहमी सर्वांच्या हिताचा नसतो.”

Shatrughan Sinha reena roy
शत्रुघ्न सिन्हा व रीना रॉय (फोटो – सिनेमातील स्क्रीनशॉट)

…त्यात फक्त माझा दोष असेल – शत्रुघ्न सिन्हा

लग्न ठरल्यावरही निर्णय मागे घेण्याचा विचार डोक्यात येत होता, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी स्टारडस्ट मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत कबूल केलं होतं. “त्यावेळी मला खूप भीती वाटत होती, मी खूप घाबरलो होतो. कारण मी बॅचलर म्हणून आनंदी होतो. पण आयुष्यात मी अशा टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे मला निर्णय घेणं भाग होतं. शेवटच्या क्षणापर्यंत मला त्या निर्णयापासून मागे हटायचं होतं. लग्न मुंबईत होतं आणि मी लंडनला होतो. मी शेवटची फ्लाइट पकडली, ज्यामुळे मी माझ्याच लग्नात वेळेवर पोहोचू शकलो. पूनमला वाटलं मी मागे हटतोय, पण तरीही ती माझ्याशी खूप चांगली वागली. आमच्या लग्नात जर काही त्रुटी असतील तर त्यात फक्त माझा दोष असेल, तिचा नाही,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.

Shatrughan Sinha wife poonam sinha
शत्रुघ्न सिन्हा व त्यांची पत्नी पूनम सिन्हा (फोटो – स्क्रीनशॉट)

हेही वाचा – “मला खूप वैताग…”, गोविंदाच्या लेकीने फ्लॉप बॉलीवूड करिअरबद्दल केलंय भाष्य; ‘या’ एकमेव चित्रपटात केलंय काम

लग्नानंतरही रीनाच्या संपर्कात होते शत्रूघ्न सिन्हा

पूनम त्यांच्या लग्नाची तयारी करत असताना शत्रुघ्न रीना रॉयबरोबर स्टेज शोसाठी लंडनमध्ये होते. “होय, मी लग्नाच्या तयारीसाठी तिथे नव्हतो,” याची कबुली त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिली आहे. लग्नानंतरही शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयच्या संपर्कात होते, या गोष्टीचा पूनम सिन्हा यांना खूप त्रास झाला होता. याबाबत शत्रुघ्न सिन्हा यांनी या पुस्तकात सांगितलं होतं. “माझ्यासाठीही हा कठीण काळ होता कारण मलाही हा भावनिक गुंता सोडण्यात वेळ लागत होता. प्रॉमी (पूनम) खूप रडायची, पण तिला माहीत होतं की मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. आम्हाला सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून वैवाहिक आयुष्याची सुरुवात करायला थोडा वेळ लागला. कारण तिथे मी केलेल्या कमिटमेंटचा प्रश्न होता. ‘तू लग्न करून संसार थाटलाय, मग मी वापरून फेकून द्यायला फक्त खेळणी आहे का?’ असा प्रश्न मी तिच्यासोबत (रीना) बाहेर असताना मला तिने विचारला होता,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.

शत्रुघ्न व पूनम यांच्या लग्नानंतर तीन वर्षांनंतर रीना रॉयने १९८३ मध्ये माजी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानशी लग्न केलं. मात्र नऊ वर्षांनी १९९२ साली ते विभक्त झाले. घटस्फोटानंतर रीनाने परत लग्न केलं नाही. दरम्यान, शत्रुघ्न आणि पूनम यांना लव व कुश ही जुळी मुलं आणि सोनाक्षी अशी तीन अपत्ये आहेत.

Story img Loader