Abhishek Bachchan Aishwarya Rai wedding Story: अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या नात्याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाबरोबर राहत नसल्याचं म्हटलं जात आहे. ती मुलगी आराध्या व आईबरोबर वेगळी राहतेय अशी चर्चा आहे. अभिषेक (Abhishek Bachchan) व ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल या गोष्टी मागच्या काही काळापासून सातत्याने होत आहेत. अनेकदा ते सर्वजण एकाच कार्यक्रमात वेगवेगळे पोहोचताना दिसतात.

ऐश्वर्या व अभिषेक यांचे लग्न २००७ मध्ये झाले होते. त्यांच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. या दोघांचे लग्न मोठ्या थाटात पार पडले होते. त्यांच्या लग्नासाठी बच्चन कुटुंबाने इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटींनी निमंत्रित केलं होतं. पण या लग्नाशी संबंधित शत्रुघ्न सिन्हा यांचा एक किस्सा आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी ऐश्वर्या व अभिषेकच्या लग्नाची मिठाई परत पाठवली होती. ही बाब मान्य करत शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यामागचं कारणही सांगितलं होतं.

संजय दत्तने सायरा बानो यांना आईसमोर भर कार्यक्रमात केलं होतं प्रपोज, अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाल्या, “नर्गिस आपा…”

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नानंतर बच्चन कुटुंबाने पाठवलेल्या मिठाईला शत्रुघ्न सिन्हा यांनी हातही लावला नाही. बच्चन कुटुंबाने त्यांच्या घरी मिठाई पाठवली होती, जी त्यांनी परत पाठवली. अभिषेक बच्चन व ऐश्वर्याचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले होते, या लग्नाला चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण या लग्नाचे निमंत्रण शत्रुघ्न सिन्हा यांना नव्हते. त्यामुळे जेव्हा त्यांना लग्नाची मिठाई पाठवण्यात आली तेव्हा त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला.

प्रियांका चोप्रा-अक्षय कुमारच्या २१ वर्षे जुन्या रोमँटिक गाण्यावर मानसी नाईकच्या दिलखेचक अदा; चाहते म्हणाले…

शत्रुघ्न सिन्हा व अमिताभ बच्चन (Shatrughan Sinha Amithabh Bachchan Clash) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र दोघांचे एकमेकांशी फार चांगले संबंध नव्हते. कदाचित याच कारणामुळे त्यांना लग्नाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. शत्रुघ्न सिन्हा यांना एका मुलाखतीत लग्नातील मिठाई परत करण्याबाबत विचारण्यात आलं होतं. “बच्चन कुटुंबाने जे त्यांचे मित्र नव्हते त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे जर लग्नाचे निमंत्रणच नसेल तर मिठाई पाठवून काय उपयोग,” अशी प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली होती.

abhishek bachchan Aishwarya Rai wedding photo
ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांचा लग्नातील फोटो

“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव

अभिषेक बच्चनने यावर दिली होती प्रतिक्रिया

‘कॉफी विथ करण’मध्ये अभिषेक बच्चन शत्रुघ्न सिन्हा यांच्या नाराजीबद्दल बोलला होता. तसेच बच्चन कुटुंबाने शत्रुघ्न सिन्हा यांना त्याच्या व ऐश्वर्याच्या लग्नात का बोलावलं नव्हतं हेही सांगितलं होतं. अभिषेकच्या मते, त्याचं ऐश्वर्याशी लग्न झालं त्यावेळी त्याच्या आजीची प्रकृती खूपच खराब होती, त्यामुळे जास्त लोकांना लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. लग्नानंतर बच्चन कुटुंबाने अभिषेक-ऐश्वर्याला सर्वांचे आशीर्वाद मिळावे यासाठी मिठाई पाठवली होती, पण ती मिठाई शत्रुघ्न सिन्हा यांनी परत पाठवली होती.

Story img Loader