कपूर कुटुंबियांपाठोपाठ बच्चन कुटुंबीय यांची सर्वत्र चर्चा आपल्याला पाहायला मिळते. यातील अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राज बच्चन या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या बऱ्याच बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. यावर अद्याप ऐश्वर्या व अभिषेक यांनी कोणतंही वक्तव्य केलं नसलं तरी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून या बातम्या किती खोट्या आहेत हे सिद्ध केलं आहे. अशातच आता अभिषेकची बहिण श्वेता बच्चनचं एक जुनं वक्तव्य समोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महानायक अमिताभ बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अभिषेकने अभिनयात नशीब आजमावलं अन् स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं तर श्वेता बच्चन नंदा ही एक उत्तम लेखिका आहे. श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बच्चन कुटुंबियांची नात नव्या नवेली नंदा हीच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमध्ये नुकतीच श्वेता बच्चन नंदा व जया बच्चन या मायलेकीने हजेरी लावली अन् मोनमोकळ्या गप्पाही मारल्या. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा श्वेता बच्चनचा व्हिडीओ हा तसा जुना आहे.

आणखी वाचा : “…तर मी हॉलिवूडमध्ये जाईन”, जेव्हा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी केलेलं मोठं वक्तव्य

२०१९ साली प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅटशोवर श्वेता आणि अभिषेक यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी रॅपिड फायर राऊंडदरम्यान करणने श्वेताला एक फारच अडचणीचा प्रश्न विचारला अन् श्वेताने तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. करण जोहरने त्यावेळी प्रश्न विचारला, “तुझ्यामते सर्वात उत्तम अभिनेता कोण? अभिषेक की ऐश्वर्या?” तेव्हा जराही विलंब न करता या प्रश्नाचं उत्तर श्वेताने दिलं ते म्हणजे अभिषेक बच्चन हे नाव.

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत असून नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी खरंच अभिषेक हा ऐश्वर्यापेक्षा उत्तम नट असल्याचं कबूल केलं आहे तर काहींनी या वक्तव्यावरुन श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनाच ट्रोल केलं आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येऊ लागल्याने असे काही जुने व्हिडीओजदेखील समोर येऊ लागले आहेत. अभिषेक बच्चन नुकताच ‘घुमर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला तर ऐश्वर्या राय बच्चन ही नुकतीच मणी रत्नम यांच्या ‘पीएस १’ आणि पीएस २’मध्ये झळकली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When shweta bachchan answers who is best actor abhishek bachchan or aishwarya rai avn