‘स्टुडन्ट ऑफ द इअर’ चित्रपटाला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने सोशल मीडियावर दिग्दर्शक करणं जोहरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने या चित्रपटाबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. या चित्रपटातून त्याने आलिया भट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा या नव्या कलाकारांना संधी दिली आहे. या चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आलिया भट एकमेकांना डेट करत होते. दोघांनी हे जाहीर केले नव्हते. या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती.
सिद्धार्थने फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत विचारले होते की ‘तुला पडद्यावर कोणत्या अभिनेत्रीला किस करायला आवडेल’? तेव्हा सिद्धार्थने उत्तर दिले होते ‘ दीपिका पदुकोण, आशा आहे, लोक याचा आनंद घेतील आणि मीपण’, याच दरम्यान तो अभिनेत्री आलिया भटला डेट करत होता. ‘स्टुडन्ट ऑफ द इअर’ चित्रपटातील आलिया भट बरोबरच्या किसिंग सीनबद्दल सिद्धार्थ म्हणाला होता, ‘आलिया बरोबरचा किसिंग सीन बोअरिंग होता, तो टेक्निकली चित्रित केला होता, ज्यात अनेक रिटेक्स होते’.
“मला डावलून त्याने… ” अक्षयने आमिर खानबाबत केला खुलासा
सिद्धार्थ आलियाने ‘स्टुडन्ट ऑफ’ द इअरनंतर ‘कपूर अँड सन्स’ या चित्रपटात काम केले होते. आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ब्रेकअपनंतर आपापले मार्ग पूर्णपणे वेगळे केले. ‘कपूर अँड सन्स’नंतर त्यांनी कधीच एकत्र स्क्रीन शेअर केला नाही. आता आलिया भट्टने रणबीर कपूरशी लग्न करून आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राही कियारा अडवाणीबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.
सिद्धार्थचा ‘थॅंक गॉड’ हा चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर २५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थबरोबर यामध्ये अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘योद्धा’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ सैन्यातील एका जवानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.