आपल्या संगीताने आणि गायकिने जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घालणारे संगीतकार-गायक ए आर रेहमान यांच्या विविध भाषांमधील गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत यांचा मिलाप त्यांच्या गाण्यांमधून पाहायला मिळतो. त्यांनी ऑस्कर पुरस्कारवरही स्वतःचे नाव कोरले आहे. जगभरातील आघाडीच्या संगीतकारांमध्ये त्यांचं नाव सामील आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे की या अशा दिग्गज संगीतकाराकडे गाणं गाण्यास अलका याग्निक यांनी नकार दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ए आर रेहमान हे नाव परिचयाचं नसल्याने अलका याग्निक यांनी नकार दिल्याचं स्पष्ट केलं होतं. गेल्यावर्षी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ही त्यांची आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचंही अलका यांनी कबूल केलं होतं. ‘ओ२ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अलका याग्निक यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. रेहमान यांच्या ‘रोजा’ चित्रपटातील अल्बमची सगळी गाणी गाण्यासाठी सर्वप्रथम अलका याग्निक आणि कुमार सानू यांना विचारण्यात आलं होतं.

आणखी वाचा : विवेक ओबेरॉयला लागलेत मराठी चित्रपटात काम करायचे वेध; म्हणाला “मी आणि रितेश देशमुख…”

याविषयी बोलताना अलका याग्निक म्हणाल्या. “मला रेहमानच्या ऑफिसमधून फोन आल्यावर मी कुमार सानूला फोन केला आणि त्यालाही रेहमानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल विचारणा झाल्याची विचारपुस केली. त्यावर कुमार सानूने सांगितलं की त्यालाही या अल्बममधील गाणी रेकॉर्ड करण्यासाठी विचारण्यात आलं आहे. तो त्यासाठी जाणार आहे का असं विचारल्यावर कुमार म्हणला, नाही मी याला नकार दिला आहे, कोण रेहमान? मीसुद्धा कुमारच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणाले की हो कोण रेहमान मीसुद्धा ओळखत नाही. अशा रीतीने आम्ही दोघांनी ती ऑफर नाकारली.”

आणखी वाचा : ‘या’ अभिनेत्रीच्या संशयास्पद मृत्यूनंतर रवीना टंडनला मिळालं ‘टीप टीप बरसा पानी’ हे गाणं

यानंतर जेव्हा अलका याग्निक यांनी ‘रोजा’ची गाणी ऐकली तेव्हा त्यांना या गोष्टीचा खूप जास्त पश्चात्ताप झाला. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “मी जेव्हा रोजामधील गाणी ऐकली त्यावेळी मला माझं डोकं भिंतीवर आपटावंसं वाटलं. हे माझं सर्वात मोठं नुकसान होतं.” रेहमाननेही पदोपदी या गोष्टीची जाणीव पुढे काम करताना अलका याग्निक यांना करून दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘रोजा’ या चित्रपटाच्या माध्यमातून रेहमानने संगीतक्षेत्रात पदार्पण केलं. यातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. यानंतर रेहमानने मागे वळून पाहिलंच नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When singer alka yagnik refused to sing for a r rahmans debuet film roja avn