प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘सावंरिया’ चित्रपटातून पदार्पण केलेल्या सोनमने ‘निरजा’, ‘रांझणा’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला. कपूर घराण्यात जन्मलेल्या सोनमलाही लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला होता. सोनम कपूरने एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनमने ‘अक्ट्रेस राऊंडटेबल’ या राजीव मसंद यांच्या शोला हजेरी लावली होती. या भागात सोनमसह आलिया भट्ट, राधिका आपटे, विद्या बालन व अनुष्का शर्माही सहभागी झाल्या होत्या. या मुलाखतीत सोनमने तिच्या बरोबर घडलेला प्रसंग सांगतिला होता. १३ वर्षांची असताना सोनमबरोबर एका व्यक्तीने लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा>> ८४ खोल्या, ७० गाड्या अन् लक्झरी व्हिलाचं बुकिंग; सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या लग्नाची जय्यत तयारी

चित्रपटगृहात सिनेमा बघण्यासाठी गेलेले असताना सोनम कपूरबरोबर हा प्रसंग घडला होता. “चित्रपटगृहात असताना एका व्यक्तीने मागून येऊन माझ्या छातीला पकडलं. तेव्हा मी छोटी होते. मी घाबरुन थरथरत होते. मी काय करू हे मला कळत नव्हतं. उभी राहून मी जोरजोरात रडायला लागले”, असा खुलासा सोनमने प्रसंगाबाबत बोलताना केला होता.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’ची किली पॉललाही भूरळ; गायलं ‘बेशरम रंग’ गाणं, व्हिडीओ व्हायरल

सध्या सोनम मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोनमने २०१८मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वीच सोनम व आनंद अहुजा आईबाबा झाले आहेत. ऑगस्ट महिन्याच सोनमने गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचं नाव त्यांनी ‘वायू’ असं ठेवलं आहे.