२००७ मध्ये फराह खान दिग्दर्शित आणि शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असणारा ‘ओम शांती ओम’ हा सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. या सिनेमातून दीपिकाने सिनेसृष्टीत पदार्पण केले होत. भारतासह इतरही बाहेरील देशांमध्ये या चित्रपटाला पसंती मिळाली. ‘ओम शांती ओम’बरोबरच रणबीर कपूर व सोनम कपूरचा ‘सावरिया’ प्रदर्शित झाला होता. तरीही शाहरुखच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेगवेगळ्या गोष्टींसाठी ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट खास ठरला. यातील सगळी गाणीही प्रचंड गाजली. आजही लोकांच्या तोंडी आपल्याला ही गाणी ऐकायला मिळतात. वेगवेगळ्या मूडची वेगवेगळ्या धाटणीची गाणी यात आपल्याला ऐकायला मिळाली. त्यापैकीच शाहरुख खानवर चित्रित झालेल्या ‘दर्द-ए-डिस्को’ या आयटम सॉन्गची प्रचंड चर्चा झाली.

आणखी वाचा : प्रभासच्या ‘या’ निर्णयामुळे ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांचे वाचले कोट्यावधी रुपये; नेमकं कसं ते जाणून घ्या

या गाण्यासाठी शाहरुखने खास त्याच्या शरीरावर मेहनत घेत सिक्स पॅक तयार केले अन् प्रथमच शाहरुख सलमानप्रमाणे कॅमेरासमोर शर्टलेस झाला. त्यावेळी हे गाणं प्रचंद गाजलं शाहरुखचा लूक लोकांना खूप आवडला. याबरोबरच हे गाणं गाणारे गायक सुखविंदर सिंग यांचीही प्रचंद चर्चा झाली. नुकतंच त्यांनी या गाण्याबद्दलची एक खास आठवण शेअर केली आहे. अवघ्या १० मिनिटांत विशाल शेखर यांनी सुखविंदर यांना या गाण्याची ऑफर दिली होती.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुखविंदर म्हणाले, “मी त्यावेळी एका पार्टीमध्ये होतो जेव्हा विशाल शेखर माझ्याकडे आहे. मी त्यांना एकत्र एखादं गाणं करायची विनंती केली. त्यांनी १० मिनिटांत मला ‘दर्द-ए-डिस्को’बद्दल विचारलं. त्या पार्टीत शाहरुखही होता. मी त्यावेळी हे गाणं रेकॉर्ड करताना चपला स्टुडिओच्या बाहेर काढल्या होत्या. कारण त्यावेळी मी पार्टीच्या मूडमध्ये होतो आणि मला नाचत नाचत हे गाणं रेकॉर्ड करायचं होतं. त्यात माझ्या बुटांचा आवाज येऊ नये म्हणून मी बूट बाहेर काढून ठेवले. माझ्या करिअरमधील हे असं पहिलं गाणं आहे जे मी अनवाणी रेकॉर्ड केलं आहे.”

आणखी वाचा : रामानंद सागर यांच्या ‘रामायण’वरही घातलेली दोन वर्षांची बंदी; असा काढलेला निर्मात्यांनी यावर तोडगा

जावेद अख्तर यांनी लिहिलेलं, विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेलं अन् सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील या गाण्याने आणि शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. या चित्रपटाने प्रचंड कमाईही केली. ऋषि कपूर यांच्या ‘कर्ज’ या चित्रपटावर हा बेतलेला होता असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When sukhwinder singh recorded shahrukh khans dard e disco song barefoot avn