अभिनेता सुनील शेट्टी हा अभिनयाव्यतिरिक्त समाजसेवेचं कामही करतो. चित्रपटांमध्ये हिरो असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही हिरो आहे. त्याचं कौतुक करण्यामागचं कारण एक घटना आहे. ज्यामध्ये सुनीलने स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक मुलींचा जीव वाचवला होता. हल्ली कोणतंही चांगलं काम केलं ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून वाहवाही लुटण्याचा प्रयत्न केला जातो. पण सुनील शेट्टीने केलेल्या या कार्याबद्दल अनेक वर्षे कुणालाच माहीत नव्हतं.

Bigg Boss 16: स्पर्धकांनी अंकित गुप्ताला दाखवला बाहेरचा रस्ता; कारण कळताच ‘बिग बॉस’सह सलमान खानवर संतापले चाहते

ही घटना १९९६ साली घडली होती. सुनीलने तब्बल १२८ मुलींना मानवी तस्करीपासून वाचवलं होतं. ५ फेब्रुवारी १९९६ रोजी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबईच्या कामाठीपुरा भागात छापेमारी केली होती. त्याठिकाणाहून त्यांनी तब्बल ४५६ मुलींची सुटका केली होती. त्या सर्व मुली १४ ते ३० या वयोगटातील होत्या. यापैकी १२८ मुली या नेपाळच्या होत्या. त्यापैकी निम्म्या मुली या अल्पवयीन होत्या.

“मी महान दिग्दर्शक…”; रोहित शेट्टीने सांगितलं ‘बॉयकॉट’ ट्रेंडमध्येही चित्रपट हिट होण्याचं कारण

पोलिसांनी या मुलींची कामाठीपुऱ्यातून सुटका तर केली, पण नेपाळ सरकारने या मुलींना देशात आणण्यास नकार दिला होता. या मुलींकडे जन्माचा दाखला किंवा नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नसल्याचे नेपाळ सरकारने म्हटले होते. त्यामुळे त्या सर्व मुली आपण नेपाळचे नागरिक असल्याचं सिद्ध करू शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्या मुलींचं आता काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

Bigg Boss 16: आई-बहिणींवरून शिव्या देणाऱ्या स्टॅन-शालीनवर संतापला सलमान खान; म्हणाला, “तुमची पातळी…”

यानंतर सुनील शेट्टी त्या मुलींसाठी देवदुतासारखा धावून आला. त्याने त्या १२८ मुलींना घरी पाठवण्यासाठी व्यवस्था केली होती. त्याने मुलींना काठमांडूला पाठवण्यासाठी विमानाची तिकिटं काढली होती. तसेच सर्व मुली सुरक्षितपणे आपापल्या घरी पोहोचतील, याचीही काळजी घेण्यात आली. या मदतीबाबत सुनीलने कधीच भाष्य केलं नाही. कारण या घटनेबद्दल कुठेही वाच्यता झाल्यास या मुलींना धोका होऊ शकतो, अशी भीती त्याला वाटत होती.

‘अवतार २’ने केली ‘केजीएफ २’ची नक्कल; नेटकऱ्याच्या ‘या’ टिप्पणीवर चाहत्यांनी केली कानउघडणी

सुनील शेट्टीने केलेल्या या मदतीबद्दल तब्बल २४ वर्षांनी २०२०मध्ये खुलासा झाला. जेव्हा या मुलींपैकी एक वाचलेल्या चरिमया तमांगने एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली. सुनील शेट्टीने आपल्यासह अनेक मुलींचे प्राण वाचवले होते, असं तिने सांगितलं होतं. दरम्यान, चारिमया आता एक एनजीओ चालवते, ती वेश्याव्यवसायाला बळी पडलेल्या मुलींच्या हितासाठी काम करते.

Story img Loader