बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले नितीश भारद्वाज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांची आयएएस पत्नी स्मिता घाटे मुलींना भेटू देत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दोघेही वेगळे राहत असून त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, नितीश यांचा व त्यांच्या मुलींचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी खूप चांगला बाँड होता, असं त्यांनीच एकदा सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुशांत सिंह राजपूत आणि नितीश भारद्वाज यांनी ‘केदारनाथ’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. नितीश यांनी या चित्रपटात सारा अली खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यावेळी नितीश यांचे त्यांच्या जुळ्या मुली देवयानी आणि शिवरंजनी यांच्याशी चांगले संबंध होते. ते आपल्या मुलींना चित्रपटाच्या शूटिंगला घेऊन जात असे. त्यांच्या मुलीही सुशांतला भेटायच्या आणि तो त्यांचे खूप लाड करायचा.

राखी सावंत बुरख्याच्या आत बिकिनी घालून…; फराह खानने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तिच्याबरोबर काम करणं…”

एकदा सुशांतने आपल्या मुलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं वचन दिलं होतं, पण तो शुभेच्छा द्यायला विसरला. यानंतर सुशांतने देवयानी आणि शिवरंजनी यांची माफी मागितली होती. सुशांत नितीश यांच्या मुलींचा चांगला मित्र होता. २०२० मध्ये सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा या बातमीमुळे मोठा धक्का बसला, असं नितीश यांनी म्हटलं होतं.

पुण्याच्या आहेत ‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांच्या दुसऱ्या पत्नी, जाणून घ्या IAS अधिकारी स्मिता घाटेंबद्दल

नितीश भारद्वाज त्यांच्या आयएएस पत्नी स्मिता यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत. आपण खूप दिवसांपासून आपल्या मुलींना पाहिलेलं नाही. आपल्या मुली कुठे आहेत किंवा कोणत्या शाळेत शिकत आहेत हेही माहीत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. तर यावर उत्तर देताना त्यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या की नितीश स्वतःच भेटण्यास नकार देतात. मागच्या चार वर्षांत ते फक्त तीनदा मुलींना भेटले आहेत. इतकंच नाही तर ते मुलींच्या आर्थिक जबाबदाऱ्याही उचलत नाहीत, असंही स्मिता यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When sushant singh rajput said sorry to nitish bhardwaj twin daughters know incident hrc