बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सिनेसृष्टीतील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. दमदार अभिनय आणि हटके भूमिकांसाठी विकीला खास ओळखले जाते. विकी कौशलने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्री कतरिना कैफसोबत लगीनगाठ बांधली. ते दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या विकी कौशलची पत्नी कतरिना कैफ ही तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विकी कौशल आणि दीपिका पदुकोण यांच्यात काही कारणांमुळे वाद निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. एकदा एका मुलाखतीत विकी कौशलने दीपिका पदुकोणबद्दल भाष्य केले होते.

दीपिका पदुकोण ही सध्या सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. ती कायमच चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी दीपिका आणि विकी कौशल यांच्यात काही कारणांमुळे मतभेद झाले होते. त्या दोघांनीही एकत्र स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर कतरिनाच्या लग्नाच्या फोटोंवर दीपिकाने कमेंट करत अभिनंदन केले होते.

anant ambani and Radhika merchant dance at best friend sangeet ceremony video viral
Video: “अनारकली डिस्को चली…”, मुकेश अंबानींच्या धाकट्या सूनेचा मैत्रिणींसह जबरदस्त डान्स, तर अनंत अंबानी थिरकला ‘या’ गाण्यावर
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
vicky kaushal
Video: विकी कौशलने पाटणामध्ये घेतला लिट्टी-चोखाचा आस्वाद; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला…
nita ambani at Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत; नीता अंबानींसह पाहुण्यांची मांदियाळी
Anusha Dandekar at Priyanka Chopra brother Siddharth sangeet watch video
Video: प्रियांका चोप्राच्या भावाच्या संगीत सोहळ्याला मराठी अभिनेत्रीची हजेरी, ग्लॅमरस लूकची होतेय चर्चा
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल

त्यानंतर कतरिनाने दीपिकाचा जिममधील एक व्हिडीओही शेअर केला होता. या व्हिडीओनंतर त्यांच्यातील दुरावा कमी झाल्याचे बोललं जात होतं. यानंतर आता विकी कौशलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्याने दीपिकाबद्दल सांगितले होते.

विकी कौशलने त्याच्या राझी या चित्रपटादरम्यान बॉलिवूड हंगामाला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याला रॅपिड फायरचे प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी त्याला कतरिना किंवा दीपिका यातील एकाची निवड करण्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने क्षणार्धात ‘दीपिका’ असे म्हटले होते. यावेळीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाहसोहळा ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये शाही थाटात पार पडला. ते दोघेही ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. हा संपूर्ण सोहळा ७ ते ९ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या लग्नात कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. या दोघांच्या लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आले होते.

Story img Loader