अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने ९०च्या दशकात बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मिनाक्षीने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. तिने पेशाने बँकर असलेल्या हरीश म्हैसूरशी लग्न केलं आणि अमेरिकेला स्थायिक झाली. सध्या ती काय करते आणि तिच्या कुटुंबात कोण कोण आहे, ते जाणून घेऊयात.
“मर्द असाल तर मणिपूर फाइल्स चित्रपट बनवा”, युजरने आव्हान दिल्यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले, “इतका…”
लग्नानंतर मिनाक्षी शेषाद्री टेक्सासमधील प्लॅनो इथे राहते. मनोरंजनसृष्टी सोडल्यानंतर आता ती अमेरिकेत डान्स क्लास चालवते. किवा एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. तिच्या मुलाचे नाव जोश म्हैसूर व मुलीचे नाव केंड्रा म्हैसूर आहे. मिनाक्षी तिच्या चौकोनी कुटुंबाबरोबर अमेरिकेत आनंदी आहे.
एकेकाळी मिनाक्षी व गायक सोनू निगमच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. पण नंतर तिने इनव्हेस्टमेंट बँकर हरीश म्हैसूरशी लग्न केलं आणि करिअर सोडून अमेरिकेत स्थायिक झाली. मिनाक्षी सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ७० हजारांच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.