Mohra Actress Poonam Jhawer: ‘मोहरा’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि रवीना टंडन यांचा दमदार अभिनय यात पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ आणि ‘ना कजरे की धार’ ही दोन गाणी खूप गाजली होती. ती आजही आपल्याला ऐकायला मिळतात. यातील कलाकार अजुनही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. पण तुम्हाला ‘ना कजरे की धार’मधील आठवते का? यात ती सुनील शेट्टीसह रोमान्स करताना दिसली होती. तिने यात सुनीलच्या पत्नीची छोटीशी भूमिका केली होती. या अभिनेत्रीला इंडस्ट्रीत फारसं यश मिळालं नाही, ती शेवटची १२ वर्षांपूर्वी एका चित्रपटात साध्वीच्या भूमिकेत दिसली होती. ३० वर्षांनंतर ही अभिनेत्री सध्या काय करते ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मोहरा’ चित्रपटातील ‘ना कजरे की धार’ या गाण्यात सुनील शेट्टीची पत्नी प्रिया अग्निहोत्रीची भूमिका अभिनेत्री पूनम झावरने साकारली होती. पूनम एका श्रीमंत कुटुंबातील आहे. तिने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली आणि नंतर अभिनयाकडे वळली. १९९४ साली प्रदर्शित झालेला ‘मोहरा’ हा तिचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातून तिला खूप लोकप्रियता मिळाली पण तिचं करिअर फारसं यशस्वी राहिलं नाही. काही काळानंतर ती २०१२ मध्ये ‘ओएमजी’मध्ये दिसली होती. यामध्ये ती साध्वीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिला ओळखणंही कठीण झालं होतं.

औरंगाबादमध्ये जन्म, दमदार पदार्पण अन् सुपरहिट सिनेमे करून बॉलीवूड सोडलं; आता गुगलमध्ये उच्च पदावर काम करतेय अभिनेत्री

पूनमला अभिनयक्षेत्रात तीन दशकं झाली आहेत, पण तिला स्टारडम मिळालं नाही. पहिलाच चित्रपट हिट झाला, तरीही तिचं करिअर फारसं चांगलं राहिलं नाही, मग ती दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली. तिथे तिने अनेक चित्रपट केले पण तिला फारसं यश मिळालं नाही, नंतर ती चित्रपटांपासून दूर गेली.

फक्त स्ट्रगलर म्हणून राहायचं नव्हतं- पूनम झावर

‘अमर उजाला’ला दिलेल्या एका मुलाखतीत पूनमने ती चित्रपटांपासून दूर का आहे, ते सांगितलं होतं. ज्या चित्रपटांमध्ये नवीन काहीच करायला मिळत नाही, तसे चित्रपट करायचे नसल्याचं ती म्हणाली होती. तसेच इंडस्ट्रीत फार काळ फक्त स्ट्रगलर म्हणून राहायचं नव्हतं. मी चांगल्या भूमिका शोधत होते, पण मला अशा भूमिका मिळाल्या ज्या मला आवडत नव्हत्या. मी वयानुसार एका चित्रपटात साडी नेसू शकते प्रत्येक चित्रपटात नाही, असं पूनमने म्हटलं होतं. तसेच तिने पदार्पण केलं तेव्हा तिचं शिक्षण चालू होतं त्यामुळे अनेक चित्रपट नाकारते, त्यावेळी लोकांना हिला काम करायचं नाही असं वाटत होतं असंही तिने सांगितलं होतं.

अभिनेत्री पूनम झावर (फोटो – इन्स्टाग्राम)

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

पूनम आहे गायिका

पूनम अभिनेत्री आहेच पण ती चांगली गायिकादेखील आहे. तिने २००३ मध्ये चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. तिने सर्वात आधी ‘आँच’ चित्रपटाची निर्मिती केली. त्यात आयशा जुल्का, नाना पाटेकर आणि परेश रावल होते. तिने मराठी चित्रपटांची निर्मितीही केली आहे. पूनम एक उत्तम गायिकादेखील आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये गाणीही गायली आहेत. तसेच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

अवघ्या २३ व्या वर्षी अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह केली पूजा; फोटोंमध्ये दाखवली घराची झलक

चित्रपटांपासून दूर तरीही करते चांगली कमाई

‘ओएमजी’नंतर पूनम झावर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. २०१२ पासून ती इंडस्ट्रीपासून दूर गेली. या गोष्टीला आता १२ वर्षे झाली आहेत. आता ती अभिनय करत नसली तरी प्रॉडक्शन हाऊसमधून पैसे कमावते. तसेच ती गाणी व सोशल मीडिया प्रमोशनमधूनही भरपूर कमाई करते. त्याचबरोबर ती एनजीओसाठी काम करते आणि राजकीय पक्षांचा प्रचारही करते, यातून तिला चांगले पैसे मिळतात. पूनम ‘ड्रीम्स कॅचर’ नावाची इव्हेंट कंपनी देखील चालवते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where is mohra actress poonam jhawer is running production house hrc