महानायक अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय व त्यांची मुलगी श्वेता नंदा यांच्यात काहीतरी बिनसलंय का? अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. त्यामागे कारणंही दोन आहेत. पहिलं म्हणजे पॅरिस फॅशन विकमध्ये ऐश्वर्या आणि श्वेताची मुलगी नव्या दोघींनी रॅम्पवॉक केला. तिथे जया बच्चन व श्वेता दोघीही हजर होत्या. पण श्वेताने मात्र फक्त मुलीबद्दलची पोस्ट शेअर केली, त्यात ऐश्वर्या राय नव्हती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“म्हातारचळ लागलेले आजी-आजोबा” म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “तुमच्या घराण्यात…”

११ ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस होता. त्यादिवशी नव्या व श्वेता यांनी स्टोरीला सेलिब्रेशन फोटो शेअर केला होता. त्यात बिग बींबरोबर नव्या, अगस्त्य, आराध्या व जया बच्चन होते. पण तोच फोटो ऐश्वर्याने मात्र क्रॉप करून पोस्ट केला. ज्यात फक्त आराध्या व आजोबा अमिताभ बच्चन दिसत होते. त्यानंतर या श्वेता व ऐश्वर्या यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर श्वेताचं ऐश्वर्याबद्दल एक जुनं विधान व्हायरल झालं आहे.

अविनाश नारकरांना नेटकरी म्हणाला ‘आजोबा’, ऐश्वर्या नारकरांनी दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

अभिषेक बच्चन एकदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये त्याची बहीण श्वेताबरोबर गेला होता. जिथे करणने श्वेताला ऐश्वर्याबद्दल प्रश्न विचारले होते. करणने श्वेताला विचारले होते की तिला ऐश्वर्याबद्दल काय आवडते, ती ऐश्वर्याच्या कोणत्या गोष्टी सहन करते आणि तिला तिच्याबद्दल कोणत्या गोष्टी आवडत नाही?

श्वेता ऐश्वर्याबद्दल विचालेल्या प्रश्नांची उत्तरं देताना म्हणाली होती, “ती सेल्फ मेड, मजबूत महिला आहे आणि खूप चांगली आई आहे. त्याचबरोबर ऐश्वर्याचे टाइम मॅनेजमेंट ही गोष्ट मी सहन करते. तसेच ती कधीच कॉल आणि मेसेजेसना वेळेवर उत्तर देत नाही ही तिची गोष्ट मला अजिबात आवडत नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which things shweta bachchan does not like about aishwarya rai bachchan hrc