Who is Aliya Fakhri: बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीची बहीण आलिया फाखरीला एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स आणि त्याची मैत्रिण अॅनास्तेसिया स्टार एटीन यांना जिवंत जाळल्याप्रकरणी २६ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. आलियाने न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथे एका गॅरेजला आग लावली, त्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. तिला जामीन नाकारण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी ठरल्यास आलियाला तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ४३ वर्षीय आलिया फाखरीने २३ नोव्हेंबर रोजी क्वीन्स येथे एका घराच्या गॅरेजला जाणीवपूर्वक आग लावली. यात तिचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स (वय ३५ वर्षे) व त्याची मैत्रिण अॅनास्तेसिया स्टार एटीन (वय ३३ वर्षे) मृत्यूमुखी पडले. आलियाचं एडवर्डशी ब्रेकअप झालं होतं, पण ती त्याची मनधरणी करत होती, एडवर्डने नकार दिल्यानंतर तिने हे धक्कादायक कृत्य केलं.

हेही वाचा – एक्स बॉयफ्रेंड व त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळलं, बॉलीवूड अभिनेत्रीच्या बहिणीला अटक

आरोपानुसार, आलिया सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी त्या गॅरेजजवळ पोहोचली. “तुम्ही आज मरणार आहात,” असं ओरडून तिने गॅरेजला आग लावली.

तीन मुलांचा बाप असलेल्या एडवर्ड जेकब्सने वर्षभरापूर्वी आलियाशी ब्रेकअप केलं. एडवर्डच्या आईने न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या माहितीनुसार, “त्याने ब्रेकअप केल्यावर तो तिला नातं संपलंय, माझ्यापासून दूर जा, असं सांगत होता. मात्र ती नकार पचवू शकत नव्हती.” एडवर्डबरोबर मारली गेलेली तरुणी ही त्याची मैत्रीण होती, दोघांचं अफेअर नव्हतं, असंही तिने स्पष्ट केलं.

हेही वाचा – अभिनेत्री शोभिता आढळली मृतावस्थेत, राहत्या घरी संपवलं आयुष्य

कोण आहे आलिया फाखरी?

४३ वर्षांची आलिया फाखरी ‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाखरीची लहान बहीण आहे. आलिया अमेरिकेतील क्वीन्समध्ये लहानाची मोठी झाली. आलिया व नर्गिसचे वडील मोहम्मद फाखरी पाकिस्तानी आहेत, तर त्यांची आई मेरी फाखरी झेक आहे. या बहिणी लहान असतानाच त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला.

हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक

इंडिया टुडेने नर्गिस फाखरी यांच्या जवळच्या स्त्रोताच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, नर्गिस तिची बहीण आलियाच्या संपर्कात नाही. जवळपास २० वर्षे झाली, तिचा तिच्याशी काहीच संपर्क नाही. तिला माध्यमांकडून या घटनेची माहिती समजली आहे. त्यामुळे ती या प्रकरणावर भाष्य करू शकणार नाही.

नर्गिस फाखरी शूटिंगमध्ये व्यग्र

नर्गिस फाखरीने गेल्या आठवड्यात चाहत्यांना ती ‘हाऊसफुल 5’ च्या शेवटच्या शेड्यूलसाठी शूटिंग करत असल्याची माहिती दिली होती. या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, फरदीन खान, रितेश देशमुख, संजय दत्त, जॅकलीन फर्नांडिस आणि जॅकी श्रॉफ यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा

नर्गिसचे चित्रपट

नर्गिसने रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘मद्रास कॅफे’, ‘मैं तेरा हीरो’, ‘हाउसफुल 3’, ‘तोरबाज’, ‘शिव शास्त्री बल्बोआ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली.

Story img Loader