बॉलीवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. जॅकी भगनानी व रकुल प्रीतनंतर आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. प्रियांका व परिणीती चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्रा आज (१२ मार्च रोजी) केजरीवालांची सून होणार आहे. मीरा आज जयपूरमध्ये उद्योगपती रक्षित केजरीवालशी लग्न करणार आहेत. रक्षित केजरीवाल काय करतो, त्याचं शिक्षण काय आहे, याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. चला तर मग मीरा चोप्राच्या भावी पतीबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोण आहे रक्षित केजरीवाल?

मीरा चोप्राचा भावी पती रक्षित केजरीवाल चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्याने कोलंबिया एज्युकेशन युनिव्हर्सिटीमधून फायनान्स आणि स्ट्रॅटेजीमध्ये एमबीए केलं आहे. २०१५ मध्ये रक्षितने SLAY कॉफी नावाची कंपनी उघडली. तो या कंपनीचा सहसंस्थापक आहे. त्याला शिक्षण आणि हवामानाशी संबंधित विषयांची खूप आवड आहे.

प्रियांका चोप्राची बहीण होणार केजरीवालांची सून, राजस्थानमध्ये शाही सोहळ्यात मीरा बांधणार लग्नगाठ

मीरा चोप्राच्या मेहंदीची खास डिझाइन

११ मार्चपासून मीरा चोप्राच्या लग्नाची तयारी सुरू झाली. तिने तिच्या मेहेंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या मेहंदी डिझाईन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिने मेहंदीमध्ये शिव-पार्वतीचा मंत्र लिहून घेतला.

“तुम्हाला आमचे वडील म्हणणं…”, नितीश भारद्वाज यांनी सांगितली मुलीची प्रतिक्रिया; तिसऱ्या लग्नाबद्दल म्हणाले, “मी…”

मीराच्या लग्नात कोणते सेलिब्रिटी असणार?

आज मीरा चोप्रा रक्षित केजरीवालबरोबर जयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाला चोप्रा कुटुंबाव्यतिरिक्त फिल्म इंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध लोकही उपस्थित राहणार आहेत. दिग्दर्शक मधुर भांडारकर, निर्माता संदीप सिंग, अभिनेता अर्जन बाजवा यांच्यासह इतर सेलिब्रिटी या लग्नाला हजेरी लावणार आहे.