इस्लामसाठी अभिनयक्षेत्र सोडणाऱ्या सना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बाबा सिद्दीकींच्या पार्टीत पतीबरोबर पोहोचलेली सना कान तिच्या पतीच्या कृतीमुळे चर्चेत आली आहे. सना खानही पती अनसबरोबर इथे पोहोचली होती. त्यांनी मीडियाला फोटोसाठी पोजही दिल्या. पण अनस तिचा हात धरून वेगाने चालताना दिसला. गर्भावस्थेत सनाला अशाप्रकारे ओढत घेऊन जाणाऱ्या अनसवर चाहते संतापल्याच पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: भर कार्यक्रमात गर्भवती सना खानला पतीने दिलेली वागणूक पाहून नेटकऱ्यांचा संताप, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाली…

सना व अनसचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्याला ट्रोल करत आहे. गर्भवती पत्नीला असं हात ओढत कोण घेऊन जातं, अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. कोरिओग्राफर मेल्विन लुईसशी ब्रेकअप झाल्यानंतर सनाने अनसशी लग्न केलं. मेल्विन आणि सना बराच काळ एकत्र होते पण अभिनेत्रीने त्याच्यावर हिंसाचाराचा आरोप केला होता. मेल्विन मारहाण करत असल्याचंही ती म्हणाली होती.

मेल्विनपासून वेगळं झाल्यानंतर तिने अनसशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २०२०मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. सनाचा पती मौलाना मुफ्ती अनस कोण आहे, ते जाणून घेऊयात. मौलाना मुफ्ती अनस मुळचा सुरत येथील गुजरातचा रहिवासी आहे. तो धर्मगुरू आणि व्यापारी आहे. अनसने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तो सनाला २०१७ मध्ये पहिल्यांदा भेटला होता. त्यानंतर त्याने सनाला ‘बहीण’ म्हणून हाक मारली होती. सुरुवातीच्या काळात सना व अनस यांच्यात फारसं बोलणं झालं नव्हतं, पण नंतर अनसने सनाची मनधरणी करण्यासाठी खूप प्रयत्न केले, नंतर तिने होकार दिला व सनाने त्याला होकार दिला आणि लग्न केलं.