नाना पाटेकर यांनी स्वबळावर बॉलीवूडमध्ये त्यांचं स्थान निर्माण केलं. गेली अनेक दशकं हिंदी व मराठी सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या नाना पाटेकरांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणाचीही मदत घेतली नाही. समोर आलेल्या परिस्थितीला तोंड देत त्यांनी यश मिळवलं. नाना पाटेकर यांच्या फिल्मी करिअरबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पाटेकर मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या पत्नीबरोबर राहत नाहीत. घटस्फोट न घेता दोघेही वेगळे राहत आहेत. नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव नीलकांती आहे. या दोघांना मल्हार हा मुलगा आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून नाना आणि नीलकांती वेगळे राहतात. या दोघांची पहिली भेट थिएटरमध्ये काम करताना झाली होती.

हेही वाचा – नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

अवघ्या ७५० रुपयांत केलेलं लग्न

नीलकांती अभिनेत्री होत्या. त्या व नाना पाटेकर थिएटर करत असताना भेटले. त्यावेळी नीलकांती बँकेत अधिकाऱ्या होत्या आणि त्यांना २५०० रुपये महिना पगार मिळायचा. दुसरीकडे नाना पाटेकर एका शोमधून ५० रुपये कमावायचे. प्रेमात पडल्यावर या दोघांन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचा खर्च अवघे ७५० रुपये होता. ते दोघे हनिमूनसाठी पुण्याला गेले होते.

नाना पाटेकर, त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर व त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर (फोटो – मल्हार पाटेकर फेसबूक)

हेही वाचा – नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

नीलकांती यांना अभिनयाची आवड होती; पण लग्नानंतर त्यांनी नोकरी चालू ठेवली. त्यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं होतं. ‘आत्मविश्वास’ असं त्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता. नीलकांती यांनी नाना पाटेकरांना अभिनयात करिअर करण्याठी पाठिंबा दिला. लग्नानंतर काही वर्षांनी नाना व नीलकांती आई-बाबा झाले. पण त्यांचा मोठा मुलगा अडीच वर्षांचा असताना त्याचं निधन झालं. त्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी मल्हार ठेवलं.

“आम्हाला बाळ नको होतं”, मुलीच्या जन्मानंतर राधिका आपटेचं वक्तव्य; म्हणाली, “मी गरोदर आहे हे कळाल्यावर…”

मोठ्या मुलाच्या निधनाचा नाना पाटेकर यांना धक्का बसला. काही वर्षांनी त्यांच्यात आणि नीलकांती यांच्यात मतभेद सुरू झाले. रिपोर्ट्सनुसार नाना पाटेकर यांचे नाव मनीषा कोईरालाबरोबर जोडले गेले होते, त्यानंतर दोघांमधील दुरावा वाढला. आताही नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी घटस्फोट न घेता वेगळे राहत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is nana patekar wife nilkanti patekar why they dont live together know details hrc