Who is playing Aurangzeb in Chhaava: विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकीच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे, ‘छावा’चा टीझर आल्यानंतर ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीझरमधील विकीच्या अभिनयाचं कौतुक होत आहे, अशातच या टीझरमधील एका पात्राने लक्ष वेधून घेतलं आहे. हे पात्र साकारणारा अभिनेता कोण, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदानाचा ‘छावा’ या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. या चित्रपटाची कथा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत कोण दिसणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
vikrant massey rajkumar hirani web sereies debut
राजकुमार हिरानींचा मुलगा ‘या’ वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता दिसणार खलनायकाच्या भूमिकेत
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
truti dimri left aashiquie 3
Aashiqui 3 चित्रपटातून ‘या’ अभिनेत्रीचा पत्ता कट? याआधीच्या बोल्ड भूमिका ठरल्या कारणीभूत

Chhaava : विकी कौशलचा रुद्रावतार, शिवगर्जना अन्…; ‘छावा’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित!

औरंगजेबच्या भूमिकेतील बॉलीवूड अभिनेता कोण?

‘छावा’च्या टीझरमध्ये औरंगजेब शेवटी दिसतो. ‘शिवा गया, पर अपनी सोच छोड गया,’ असा टीझरच्या शेवटी औरंगजेबचा डायलॉग आहे. टीझर रिलीज झाल्यावर औरंगजेब साकारणारा अभिनेता नेमका कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा आणि आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारणारा बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना ‘छावा’ चित्रपटात मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका यामध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा- ‘छावा’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना कसा वाटला? विकी कौशलचा लूक पाहून काय म्हणाले मराठी कलाकार?

‘छावा’च्या टीझरमुळे वाढल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा

‘छावा’मध्ये प्रेक्षकांना अक्षय खन्ना (Akshaye Khanna) औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये अक्षयने लक्ष वेधून घेतलं आहे, त्यामुळे तो हे ऐतिहासिक पात्र तो कसे जिवंत करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात आलेली आव्हानं आणि त्यांचा जीवनप्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका व अक्षय खन्ना असे दमदार कलाकार असल्याने चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Akshaye Khanna
औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना (फोटो – टीझरमधून स्क्रीनशॉट)

“मला नेहमी सचिनची बायको म्हणतात…”, सुप्रिया पिळगांवकर यांचं वक्तव्य; जया ‘अमिताभ’ बच्चन वादाबद्दल म्हणाल्या…

‘छावा’ चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या कॉमेडी चित्रपटानंतर विकी आणि लक्ष्मण उतेकर यांचा हा एकत्रित दुसरा चित्रपट आहे.

Story img Loader