Prateik Babbar ex wife Sanya Sagar : दिवंगत स्मिता पाटील व राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने लग्न केलं आहे. त्याने व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्नगाठ बांधली. प्रतीकचं हे दुसरं लग्न आहे, त्याचं पहिलं लग्न सहा वर्षांपूर्वी झालं होतं. तेव्हाही त्याने प्रेमविवाह केला होता, पण त्याचा घटस्फोट झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतीकच्या पहिल्या पत्नीचे नाव सान्या सागर आहे. सान्या घटस्फोटानंतर मुंबई सोडून दुसरीकडे स्थायिक झाली आहे. सान्या सागर काय करते, ते जाणून घेऊयात.

प्रतीक बब्बरची पहिली पत्नी पत्नी सान्या सागर कोण?

सान्या सागरचा जन्म १ मे १९९० रोजी लखनऊ, उत्तर प्रदेश येथे झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती २००८ मध्ये मुंबईत आली. यानंतर तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली. सान्या पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली. तिने लंडन फिल्म अकादमीमधून फिल्ममेकिंगमध्ये डिप्लोमा केला आणि नंतर गोल्डस्मिथ्स युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून फिल्ममेकिंगमध्ये मास्टर्स पूर्ण केले.

सान्या सागर ही बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांचे निकटवर्तीय पवन सागर यांची मुलगी आहे. सान्याचे वडील राजकारणात आहेत.

सान्याचे करिअर

शिक्षण पूर्ण करून सान्या सागर भारतात परतली. तिने सुधीर मिश्रा फिल्म्समध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. मग तिने लंडनमधील रॉकलिफ लिमिटेड आणि हेल्स किचन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये काम केलं. सान्याने 11th Hour नावाच्या प्रोजेक्टवरही काम केलं. सान्याने २०१७ मध्ये ZEE एंटरटेनमेंट एंटरप्राइझ लिमिटेडची डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी सान्या सागरने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस पिंकमॉस मीडिया प्रायव्हेट लिमिटेड स्थापन केले.

प्रतीक व सान्याचे लग्न

सान्या व प्रतीक यांनी २३ जानेवारी २०१९ रोजी पारंपरिक मराठी पद्धतीने लग्न केलं होतं. दोघेही एकमेकांना नऊ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि लग्नाआधी दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर दोघांच्या नात्यात अनेक अडचणी आल्या, परिणामी दुरावा निर्माण झाला. लग्नानंतर वर्षभरानेच हे दोघे वेगळे राहत असल्याची बातमी आली. दोघांनीही नातं वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आलं. अखेर २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

सान्या सागर आता काय करते?

सान्या सागर घटस्फोटानंतर ती गोव्यातील एका गावात राहत आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या कामाबद्दल पोस्ट शेअर करत असते. तसेच तिचे इतरही फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतीच ती ‘पार्टी टिल आय डाय’मध्ये झळकली होती.