दीपिका पदुकोण व शाहरुख खान यांचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवाय मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरुन आक्षेप घेतला.

आणखी वाचा – Protest Against Pathan Movie: दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीला विरोध; चौकात जाळले दीपिका, शाहरुखचे पुतळे

दीपिकाने या गाण्यामध्ये परिधान केलेली बिकीनी कोणी डिझाइन केली हे आता समोर आलं आहे. ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिकाने परिधान केलेली बिकिनी टॉपची स्टायलिस्ट शालीन नथानीने डिझाइन केली आहे. कलाक्षेत्रामध्ये शालीन नथानीचं नाव मोठं आहे.

दिग्गज कलाकार मंडळींना वेगळा लूक देण्यामध्ये शालीनचा हातखंड आहे. असंच तिने काहीसं शाहरुख व दीपिकाबाबतही केलं. ‘ईटाइम्स’च्या वृत्तानुसार शालीन ‘बेशरम रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर खूप खुश आहे. शालीन म्हणते, “या गाण्यानुसार दीपिकाला एकदम बिनधास्त दाखवायचं होतं. चित्रपटाच्या कथेशी निगडीत गाणं असल्यामुळे ते हटके झालं पाहिजे असं सिद्धार्थ आनंदने मला सांगितलं.”

आणखी वाचा – “…तर ‘पठाण’ चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही”; भाजपा मंत्र्याचा इशारा, म्हणाले, “गाण्यातील भगवे कपडे अन्….”

“प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेला लूक दीपिका व शाहरुखला दिला पाहिजे अशी निर्मात्यांची मागणी होती. म्हणूनच या गाण्यामध्ये त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांचा रंगही हटके असावा असं मला वाटलं. मला खात्री आहे की हे गाणं शाहरुख व दीपिकालाही आवडलं आहे.” सध्या चित्रपटामधील गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेल्या कपड्यांवरून वाद सुरू असला तरी शालीन मात्र खूश आहे.

Story img Loader