Who is Shikhar Pahariya : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे जातीवरून कमेंट करणाऱ्या एका तरुणीला शिखरने चांगलंच सुनावलं आहे. जान्हवी कपूरबरोबरच्या नात्यामुळे कायम प्रकाशझोतात असलेला शिखरचे आजोबा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. शिखर पहारिया कोण आहे आणि काय करतो? ते जाणून घेऊयात.
जान्हवी कपूर १५-१६ वर्षांची होती तेव्हापासून शिखर तिच्या आयुष्यात आहे. जान्हवी व शिखर आधी रिलेशनशिपमध्ये होते, काही काळाने त्यांचं ब्रेकअप झालं आणि ते नंतर पुन्हा एकत्र आले. करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये जान्हवी कपूर तिची बहीण खुशी कपूरबरोबर सहभागी झाली होती. या शोमध्ये जान्हवीने तिच्या व शिखरच्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर अनेकदा जान्हवी शिखरबरोबर दिसते. ती त्याचं कौतुक करत असते. तसेच दोघेही बरेचदा देवदर्शनाला जात असतात. शिखर पहारिया अभिनेता नाही, त्यामुळे तो काय करतो याबद्दल बरीच चर्चा होत असते.
कोण आहे शिखर पहारिया?
शिखर पहारिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे. संजय पहारिया हे व्यावसायिक असून स्मृती शिंदे या मालिकांची निर्मिती करतात. शिखरला वीर नावाचा भाऊ आहे. वीरने नुकतंच ‘स्कायफोर्स’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
काय करतो शिखर पहारिया?
शिखर हा एक प्रोफेशनल पोलो खेळाडू आहे, त्याने २०१३ मध्ये रॉयल जयपूर पोलो टीमचा सदस्य म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पोलो व्यतिरिक्त तो प्रशिक्षित घोडेस्वार आहे. शिखरने अवघ्या १३ वर्षांचा असताना व्यवसाय सुरू केला होता. त्याची कन्सल्टन्सी फर्म आहे. पाळीव प्राण्यांच्या नवीन मालकांना कन्सल्ट करण्याचं काम शिखरची कंपनी करते. त्याने वाधावन ग्लोबल कॅपिटल लंडनमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्याने गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रात नशीब आजमावले आणि आपल्या भावाबरोबर ‘इंडियानविन’ कंपनी सुरू केली.
शिखर पहारियाची संपत्ती?
‘डीएनए’ ने दिलेल्या वृत्तानुसार, शिखर पहरियाकडे ८४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे आणि लॅम्बोर्गिनी अॅव्हेंटोरसह लक्झरी कार आहेत.