सनी देओल व अमिषा पटेल यांच्या ‘गदर २’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्बल २२ वर्षांनी ‘गदर’चा रिमेक येत आहे, त्यामुळे या चित्रपटात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी निर्माते काय ट्विस्ट आणणार, याकडे लक्ष लागलं आहे. या चित्रपटात सनी व अमिषाबरोबरच उत्कर्ष शर्मा तसेच सिमरत कौर दिसणार आहेत.

Video: अदिती राव हैदरी व सिद्धार्थ लग्न करणार? अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या कमेंट्स चर्चेत

चित्रपटात सिमरत कौर सनी देओल यांच्या सूनेची भूमिका करणार आहे. सिमरत व उत्कर्ष शर्माची जोडी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सिमरत कौर सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण याआधी ती अनेक पंजाबी म्युझिक अल्बममध्ये दिसली आहे. सिमरतने २०१७ साली तेलगू रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘प्रेमाथो मी’ मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने मिका सिंगच्या ‘तेरे बिन जिंदगी’ या रोमँटिक गाण्यातही काम केलं होतं. २०२२ मध्ये तिने नागार्जुनच्या ‘बंगाराजू’मध्ये कॅमिओ केला होता.

सिमरत कौरने तेलुगू व पंजाबी इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. आता गदर २ मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘गदर २’ चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.