ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या वयातही प्रचंड सुंदर दिसतात. तरुणींनाही लाजवेल, असं सदाबहार रेखा यांचं सौंदर्य आहे. अभिनेत्री रेखा प्रत्येक कार्यक्रमात साडी नेसून जातात. मग तो अवॉर्ड शो असो, कुणाचं लग्न असो वा बॉलीवूडमधील एखादा इव्हेंट असो. रेखा यांच्या साड्या आणि त्यांची साडी नेसण्याची पद्धत दोन्हीची बरीच चर्चा होते. रेखा क्वचितच साडीशिवाय इतर पोशाख परिधान करतात. इतर अभिनेत्रींप्रमाणे त्या वेगवेगळे पोशाख का घालत नाहीत, असा प्रश्न चाहत्यांना पडतो. तर एका कार्यक्रमादरम्यान रेखा यांनी स्वतः नेहमी साडी नेसण्यामागचं कारण सांगितलं होतं.
आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या रेखा यांचे जगभरात चाहते आहेत. त्या उत्तम अभिनेत्री तर आहेतच, पण डान्सही खूपच छान करतात. रेखा यांचे जगभरात चाहते आहेत. प्रत्येक पोशाखात सुंदर दिसणाऱ्या रेखा यांनी साडी नेसण्यामागचं कारण सांगितलं होतं.
रेखा म्हणाल्या होत्या की त्यांना अनेकदा प्रश्न विचारला जातो, की त्या नेहमी साडी का नेसतात, खासकरून कांजीवरम साडी? तसेच त्यांनी गाऊन घालावे, असा सल्लाही लोक त्यांना देतात. यावर त्यांनी दिलेलं उत्तर जाणून घेऊयात. “खरं सांगायचं तर मी कांजीवराम साडी का नेसते किंवा मी साडीच का घालते हे खूप पर्सनल आहे. तुम्हाला सिक्रेट जाणून घ्यायचे आहे का? हे खूप पर्सनल आहे, परंतु प्रायव्हेट नाही, म्हणून मला वाटतं की मी ही माहिती देऊ शकेन. माझ्यासाठी स्टाइल ही बाह्य गोष्ट नाही, ती एक भावना आहे,” असं रेखा म्हणाल्या होत्या.
रेखा साडीच का नेसतात?
“मी साडी नेसते कारण ती माझी परंपरा आहे, ते माझं मूळ आहे. साडी मला माझ्या आईची आठवण करून देते. जेव्हा मी कांजीवरम साडी नेसते तेव्हा मला प्रेम, संरक्षण आणि खूप सॉफ्टनेस जाणवते,” असं रेखा म्हणाल्या होत्या.

रेखा नेहमी साडीबरोबरच भांगेत कुंकू लावून दिसतात. मुकेश अग्रवाल यांच्याबरोबर लग्न केल्यावर रेखा यांनी कुंकू लावायला सुरुवात केली, पण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी कुंकू लावणं थांबवलं नाही. याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे रेखा यांनी उत्तर दिले होते.
एकदा भारताचे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी रेखा यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करताना विचारलं होतं, “तुमच्या भांगेत कुंकू का आहे?” यावर रेखा म्हणालेल्या “मी ज्या शहरातून आले आहे, तिथे कुंकू लावणे फॅशन आहे.”