बॉलिवूडची बहुचर्चित जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ६ नोव्हेंबरला पहिल्यांदा आई-बाबा झाले. आलियाने मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर सर्व बॉलिवूड सेलिब्रेटी आणि चाहते आलिया आणि रणबीरचं अभिनंदन करताना दिसत आहेत. आलियाने शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. पण आलियाने बाळाच्या जन्मासाठी नेमकी ६ नोव्हेंबर हीच तारीख का निवडली. यामागे खूपच खास कारण असून याबाबत प्रसिद्ध सेलिब्रेटी अंकशास्त्रज्ञ संजय जुमानी यांनी माहिती दिली आहे.

संजय जुमानी यांनी इ- टाइम्सशी बोलताना आलियाने बाळाच्या जन्मासाठी ६ तारीख निवडण्यामागचं खास कारण सांगितलं आहे. अर्थात आलियाने ही तारीख निवडली की नाही याबाबत अधिकृत माहिती नाही. कारण ती प्रसूती सामान्य होती शस्त्रक्रिया हे अद्याप समजलेलं नाही. पण या तारखेला मुलीचा जन्म होणं कपूर आणि भट्ट दोन्ही कुटुंबांसाठी खास आहे आणि असं का याचं कारणं संजय जुमानी यांनी अंकशास्त्रांनुसार समजावून सांगितलं आहे.

Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kidnap attempt of girl Lonavala, girl ,
लोणावळ्यात दोन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न; अपहरणकर्त्याला पालकांनी दिला चोप
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

आणखी वाचा- आलिया की रणबीर, कोणासारखी दिसते नात? आजी नीतू कपूर म्हणाल्या…

आलिया आणि रणबीरचं अभिनंदन करताना संजय जुमानी म्हणाले, “आलियाने तिच्या करिअरमध्ये कला आणि अभिनयावर प्रभूत्व मिळवलं आहे. आलिया आता ३० वर्षांची आहे. तिने ६ तारखेला मुलीला जन्म दिला आहे. अंक शास्त्रानुसार तिचा मुलांक ६ असून या मुलांकांवर शुक्राचा प्रभाव असतो. शुक्राचा प्रभाव असलेल्या व्यक्ती या प्रतिभाशाली आणि लोकांवर त्यांचा फार प्रभाव असतो. त्यामुळे आलियाची मुलगी मनोरंजन क्षेत्रात खूप नाव कमवू शकते. तसेच ती भविष्यात खूप लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आलियानेही ही तारीख मुद्दाम निवडली असेल किंवा योगायोगाने घडलं असेल तरीही दोन्ही कुटुंबीयांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.”

आणखी वाचा- “मुली खरंच खूप…” आई झालेल्या आलियासाठी दाक्षिणात्य स्टार महेश बाबूची खास पोस्ट

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी १४ एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले होते आणि आलियाने लग्नानंतर लगेचच तिच्या प्रेग्नन्सीची एक पोस्ट शेअर केली होती. आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच ती करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘जी ले जरा’मुळेही चर्चेत आहे. तसेच आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Story img Loader