उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा नुकताच पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली. ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन, दीपिका, रणवीर, सलमान खान, शाहरुख खान, जॉन अब्राहम यांसारखे अनेक बॉलिवूड कलाकार यावेळी सहभागी झाले होते. मात्र या कार्यक्रमात बॉलिवूडच्या कपूर कुटुंबातील व्यक्ती मात्र दिसल्या नाहीत. याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा यांचा साखरपुडा अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यावेळी बॉलिवूडमधील बहुतांश मंडळी सहभागी झाली होती. या सोहळ्याला रणबीर कपूर, आलिया भट्ट, सैफ अली खान, करीन कपूर हे कलाकार मात्र दिसले नाहीत. नुकतंच या मागचे कारण समोर आले आहे.
आणखी वाचा : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यात दीपिका पदुकोणचा शाही थाट, साडीची किंमत माहीत आहे का? 

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

काही दिवसांपूर्वी ‘फराज’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान कपूर आणि परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावलही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हंसल मेहता दिग्दर्शित, अनुभव सिन्हा निर्मित हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे एक खासगी स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. याचे काही फोटो समोर आले आहेत.

या फोटोत रणबीर कपूर, आलिया भट्ट, सैफ अली खान, करीन कपूर हे कलाकार दिसत आहेत. हे सर्वजण निर्माते आणि दिग्दर्शकांबरोबर गप्पा मारताना दिसत आहे. याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यावर कमेंट करताना काहींनी फायर इमोजी शेअर केला आहे. तर काहींनी रेड हार्ट पोस्ट केलं आहे.

आणखी वाचा : Video : लेक आराध्याचे विस्कटलेले केस पाहून ऐश्वर्याने केलं असं काही…

यावर कमेंट करताना एक व्यक्ती म्हणाला की, “यांना अंबानींच्या पार्टीसाठी बोलवण्यात आलं नव्हतं का?” तर एकजण म्हणाला, “मला वाटतंय की त्यांना बोलवलं असावं, पण त्यांनी त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य देणे गरजेचे समजले आणि ते योग्यच आहे. तर काहींनी या चित्रपटाच्या स्क्रीनिंगमुळेच त्यांना अंबानींच्या घरी जाणं शक्य झालं नसावं असं म्हटलं आहे. मात्र अद्याप याबद्दल रणबीर कपूर, आलिया भट्ट, सैफ अली खान, करीन कपूर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान करीना कपूर खान ही काही दिवसांपूर्वी आमिर खानबरोबर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता ती हंसल मेहताच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती सुजॉय घोषच्या चित्रपटातही दिसणार आहे. तर सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’, ‘गो गोवा गॉन २’, ‘फायर’ हे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. त्याबरोबर आलिया भट्टचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘हार्ट ऑफ स्टोन’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Story img Loader