बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. पण करीनाशी लग्न करण्याापूर्वी सैफने बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगबरोबर केले होते. पण काही कारणांमुळे त्यांच्याच मतभेद होऊ लागले आणि २००४ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अमृताने सैफबरोबर घटस्फोट झाल्यावर पुन्हा लग्न का केले नाही, याबद्दल भाष्य केले.
सैफ आणि अमृताने १९९१ मध्ये लग्न केले होते. त्यावेळी सैफ आणि अमृता यांच्या वयात १२ वर्षाचे अंतर होते. तरी देखील त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अमृता सिंग ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. सुरुवातीला ते दोघेही आनंदात होते. मात्र, काही काळानंतर त्यांच्याच वाद होऊ लागले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनाही सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुलं आहे.
आणखी वाचा : “मी फक्त ९ वर्षांची होते तेव्हाच…”, अमृता आणि सैफच्या घटस्फोटावर साराचा खुलासा
सैफबरोबर घटस्फोट झाल्यानंतर अमृता सिंग ही एकटी पडली होती. दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी तिने एकटीने उचलली. सैफ हा अनेकदा मुलांना भोटायला यायचा. पण अमृताने एकटीनेच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडली. पण सैफबरोबर घटस्फोट झाल्यावर अमृताने दुसरं लग्न का केलं नाही? असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. त्यावर तिने अलीकडेच उत्तर दिले आहे.
“मी सैफपासून घटस्फोट घेतल्यानंतर कधीच दुसरं लग्न करणार नाही, असा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतर मी सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोन मुलांच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करेन, असा संकल्प केला होता. सैफपासून वेगळं झाल्यावर दोन्ही मुलांच्या पालनपोषणात मला कोणतीही कमतरता ठेवायची नव्हती. याच कारणामुळे मी कधीच पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला नाही.” असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले.
दरम्यान अमृता सिंगबरोबर घटस्फोट झाल्यानंतर सैफने करीना कपूरशी लग्न केले. सैफ आणि करीनाची पहिली भेट ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टशन’ या चित्रपटादरम्यान झाली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. मात्र, करीना आणि सैफ ही जोडी बनली. सैफ आणि करीना ह बरेच वर्षे लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी कोर्टात जाऊन शासकीय पद्धतीने लग्न केले. त्या दोघांना दोन मुलं असून तैमूर आणि जहांगीर अशी त्यांची नाव आहेत.