Why Arjun Rampal girlfriend Gabriella Demetriades aren’t married : बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल व मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स दोघेही २०१९ पासून डेटिंग करत आहेत. पाच वर्षांपासून एकमेकांसोबत असलेल्या या दोघांना अरिक व आरव ही दोन मुलं आहेत, पण त्यांनी अजून लग्न केलेलं नाही. लग्न न करण्यामागचं कारण आता अर्जुनने सांगितलं आहे.

दोघांचे कुटुंब आता पूर्ण झाले आहे, तरी लग्न का केलं नाही, असा प्रश्न रणवीर अलाहाबादियाने एका मुलाखतीत अर्जुनला विचारला, त्यावर त्याने “लग्न म्हणजे काय?” असा प्रतिप्रश्न विचारला. लग्नामुळे लोक बदलू शकतात, असं मतही त्याने मांडलं. “लग्न म्हणजे काय? फक्त कागदाचा एक तुकडा. मला वाटतं की आम्ही विवाहित आहोत आणि त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण काहीवेळा तो कागदाचा तुकडा काय करू शकतो, तर तो तुम्हाला बदलतो. कारण तुम्हाला वाटतं की ते कायमस्वरूपी आहे, खरं तर ही फक्त कल्पना असते पण तुम्ही कायदेशीररित्या एकमेकांना बांधील असता,” तो म्हणाला.

अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायच्या लग्नाची मिठाई शत्रुघ्न सिन्हांनी पाठवली होती परत; कारण सांगत म्हणालेले, “बच्चन कुटुंबाने…”

लग्नामुळे माणसं बदलू शकतात – अर्जुन रामपाल

लग्नामुळे लोकांचा एकमेकांबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकतो, असंही अर्जुनला वाटतं. “लग्नामुळे तुमचा एकमेकांबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकतो. माझ्या मते आम्हा दोघांनाही असंच वाटतं. आमच्यामध्ये जे काही घडलं ते अतिशय नैसर्गिक होतं, मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही. कारण मी कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आमच्यासाठी हे नातं खूप सुंदर आहे. त्यामुळे जमेल तेवढं हे सगळं अनुभवत राहायचं. आम्ही दोघांनीही मनात एकमेकांशी लग्न केलं आहे, दोघेही एकमेकांना योग्य दिशेने आयुष्यात पुढे जाण्यास मदत करत आहोत आणि आम्ही बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड आहोत” असं अर्जुन रामपाल म्हणाला.

Arjun Rampal with girlfriend Gabriella Demetriades
अर्जुन रामपाल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (फोटो- इन्स्टाग्राम)

संजय दत्तने सायरा बानो यांना आईसमोर भर कार्यक्रमात केलं होतं प्रपोज, अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाल्या, “नर्गिस आपा…”

मी लग्न संस्थेच्या विराधोत नाही- अर्जुन रामपाल

आपण लग्न संस्थेच्या विरोधात नाही, असंही अर्जुनने नमूद केलं. “मी कोणालाही लग्न न करण्याचा सल्ला देत नाही किंवा मी तुम्हाला लग्न संस्थेच्या विरोधात जाण्यास सांगणार नाही. कदाचित आम्ही (अर्जुन व त्याची गर्लफ्रेंड) लग्नही करू,” असं त्याने सांगितलं. आपल्या नात्याबद्दल पुढे अर्जुन म्हणाला, “मला दोन सुंदर मुलं आहेत. मी खूप नशीबवान आहे. माझ्या मुली (पहिल्या लग्नापासून) व गॅब्रिएलाचं चांगलं बाँडिंग आहे, माझी पहिली पत्नी मेहर व गॅब्रिएलाचं एकमेकींशी छान जमतं.”

प्रियांका चोप्रा-अक्षय कुमारच्या २१ वर्षे जुन्या रोमँटिक गाण्यावर मानसी नाईकच्या दिलखेचक अदा; चाहते म्हणाले…

अर्जुनचं पहिलं लग्न मेहर जेसियाशी (Mehar Jesia) झालं होतं, त्यांना माहिका व मायरा नावाच्या दोन मुली आहेत. अर्जुन व मेहने १९९८ मध्ये लग्न केलं होतं, दोघेही २०१९ मध्ये विभक्त झाले.

Story img Loader