अंबानी कुटुंबियांच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये कलाक्षेत्रामधील अनेक मंडळी हजेरी लावताना दिसतात. अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणाऱ्या कलाकारांची बी-टाऊनमध्ये चर्चाही रंगताना दिसते. ईशा अंबानीच्या लग्नात अशीच एक चर्चा रंगताना दिसली. ईशा अंबानीच्या लग्नामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार जेवण वाढताना दिसले. यादरम्यानचे बरेच फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
१२ डिसेंबर २०१८मध्ये ईशा व आनंद पिरामल यांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्याला कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. शिवाय अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार जेवण वाढताना दिसले.
शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन यांसारख्या मंडळींनी या शाही विवाहसोहळ्यामध्ये जेवण वाढलं. या कलाकार मंडळींचे जेवण वाढतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं. अंबानी कुटुंबियांकडे जेवण वाढण्यासाठी माणसं असतानाही कलाकारांनी जेवण का वाढलं? असे अनेक प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात आले.
आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये गौरव मोरेचा सतत अपमान का होतो? अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “कधी कधी…”
यादरम्यान सतत होणारी ट्रोलिंग पाहून अभिषेक बच्चनने ईशा अंबानीच्या लग्नात जेवण वाढण्यामागचं कारण सांगितलं होतं. तो सांगितलं होतं की, “ही एक भारतीय परंपरा आहे. याला ‘सज्जन घोट’ असं म्हणतात. या पारंपरिक पद्धतीमध्ये वधुपक्षातील लोक वरपक्षातील पाहुण्यांना स्वत: जेवण वाढतात”. अभिषेकच्या या वक्तव्यानंतर ऐश्वर्या व अमिताभ यांनी या लग्नामध्ये पंगतीला जेवण का वाढलं? याचं खरं कारण समोर आलं.