बॉलीवूडमधील अनेक असे चित्रपट आहेत, जे त्यातील गाण्यांमुळे लोकप्रिय ठरले आहेत. आता गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खान(Shahrukh Khan) व त्यांच्या नात्यात का दुरावा निर्माण झाला, याबद्दल वक्तव्य केले आहे. अभिजीत भट्टाचार्य यांनी किंग खानच्या चित्रपटातील अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. ‘तौबा तुम्हारे इशारे’ व ‘वो लडकी जो सबसे अलग है’, या गाण्यांना आवाज दिला आहे. १९९० व २००० च्या दशकात शाहरुख खानच्या अनेक गाजलेल्या गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. मात्र, काही काळानंतर शाहरूखसाठी गायन करणे का थांबवले याबद्दल वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिजीत भट्टाचार्य यांनी नुकताच एएनआयशी संवाद साधला. यावेळी शाहरुखसाठी गाणे का थांबवले, याबद्दल बोलताना त्यांमी म्हटले, “जेव्हा स्वाभिमान दुखावला जातो, त्यावेळी पुरे झालं असं वाटतं. मी त्याच्यासाठी गात नव्हतो, मी माझं काम म्हणून गात होतो. पण, जेव्हा मी पाहिले की प्रत्येकाला स्वत:ची वेगळी आहे. सेटवर चहा विक्रेत्याला त्याची ओळख आहे. मात्र, गायकाला त्याची ओळख नाही. तेव्हा वाटले की मी त्याचा आवाज का होऊ?”

“वाईट गोष्ट ही आहे की माझे समकालीन जे गायक होते, ज्यांनी त्या चित्रपटांत काम केले होते. नंतर ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की दादा हे चूकीचे आहे. मी त्यांना सांगितले की, तुम्हीसुद्धा गाणं म्हणणं बंद केलं पाहिजे. पुढे जे होईल ते मी बघेन. हे एकदाच घडले नाही, तर दोन चित्रपटांत असेच झाले. मी त्यांना सांगितले की फराह खानबरोबर जाऊन बोला, त्यांना हे सांगा कि, तुम्ही आम्हाला क्रेडिट दिल्याशिवाय आम्ही गाणार नाही. ते मला म्हणाले, तुम्ही जा व फराह खानबरोबर बोला. मी म्हटले, “मी का सांगू? मी थेट शाहरूखला सांगेन की मला क्रेडिट दिल्याशिवाय मी तुझ्यासाठी गाणार नाही.”

अभिजीत भट्टाचार्य यांनी पुढे म्हटले, “आमच्यात मतभेद असले तरी माझे शाहरूखबरोबरचे नाते तुटले आहे, असे नाही. शाहरुख आता फक्त सामान्य व्यक्ती राहिला नाही, तो मोठा स्टार झाला आहे. कदाचित त्याला याची जाणीव नाही की त्याने कोणता पल्ला गाठला आहे. तर मी त्याच्याकडून काय अपेक्षा ठेऊ? मी आहे तोच व्यक्ती आहे. मी माझ्या पद्धतीने प्रगती करतोय. मी त्याच्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठा आहे. त्याचे वय ६० वय वर्षापेक्षा जास्त आहे. कोणी कोणाची माफी मागण्याची गरज नाही. मला त्याची किंवा त्याच्या पाठिंब्याची गरज नाही.”

हेही वाचा: “एखाद्याने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करावे तर असे”, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानिमित्ताने सलील कुलकर्णींची खास पोस्ट, म्हणाले…

दरम्यान, अभिजीत भट्टाचार्य आणि शाहरुख खानने अनेक गाजलेल्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did abhijeet bhattacharya stop singing in shah rukh khans film singer reveals reason nsp