अभिनेत्री स्मिता पाटील या आपल्याला कायमच स्मरणात राहिल्या आहेत याचं कारण आहे त्यांचा दमदार अभिनय. स्मिता पाटील यांनी समांतर आणि व्यावसायिक चित्रपट दोहोंमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा असा ठसा उमटवला. ‘अर्थ’, ‘मंडी’, ‘भूमिका’, ‘बाजार’, ‘गमन’ या चित्रपटांमधला अभिनय आठवा. त्यांनी त्या सगळ्या भूमिका शब्दशः जगल्या आहेत. वयाच्या ३१ व्या वर्षीच त्यांचं निधन झालं. मात्र स्मिता पाटील यांच्या भूमिकांनी आजही आपल्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांचा खास किस्सा सांगणार आहोत. अर्थ हा सिनेमा १९८२ मध्ये प्रदर्शित झाला.त्यानंतर स्मिता पाटील आणि महेश भट्ट यांच्यातत भांडण का झालं होतं त्याबाबतचा हा किस्सा आहे.

‘अर्थ’ सिनेमा ऑफ बीट असूनही ठरला चर्चेचा विषय

‘अर्थ’ या सिनेमात स्मिता पाटील, राज किरण, कुलभूषण खरबंदा आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमात विवाहबाह्य संबंधांवर भाष्य करण्यात आलं होतं. हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच भावला होता तर काही प्रमाणात या सिनेमावर टीकाही झाली होती. स्मिता पाटील यांनी यात कुलभूषण खरंबदाच्या प्रेयसीचं काम केलं होतं. तर शबाना आझमी यांनी पत्नीची भूमिका साकारली होती. एक विवाहित माणूस दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडला की का होतं? त्यामुळे तीन आयुष्यं कशी उद्ध्वस्त होतात हे सांगणारा हा सिनेमा होता. तोपर्यंत सिनेमात अशा प्रकारचा एखादा विषय आणला गेला नव्हता. जे काही चित्रपट याआधी आले त्यात शेवटी पत्नी पतीला माफ करते आणि तिने माफ करणंच कसं योग्य आहे हेच अधोरेखित करण्यात आलं होतं. अशात ‘अर्थ’ सिनेमा चर्चिला गेला.

Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
Priyadarshini Indalkar
“त्या स्कीटनंतर इतकं हसं झालं”, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील किस्सा; म्हणाली…
aaliya bhatta
‘हायवे’ चित्रपटातील वीरा त्रिपाठीच्या भूमिकेसाठी आलिया भट्ट नव्हे, तर ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती; दिग्दर्शकाने स्वत: केला खुलासा
Movie Poster Arth
अर्थ सिनेमाच्या रिलिजनंतर महेश भट्ट आणि स्मिता पाटील यांच्यात वाद झाला होता. (फोटो सौजन्य-फेसबुक)

तीन आघाड्यांवरची घालमेल ‘अर्थ’ सिनेमात स्पष्ट दिसली

अर्थ सिनेमा ही महेश भट्ट यांचीच कहाणी होती. कारण लग्न झालेलं असूनही ते परवीन बाबीच्या प्रेमात पडले होते. तसंच स्मिता पाटील यांचं विवाहित राज बब्बर यांच्याशी अफेअर सुरु होतं आणि शबाना आझमी यांचं विवाहित जावेद अख्तर यांच्याशी अफेअर सुरु होतं. सिनेमा बाहेर घडणाऱ्या या गोष्टींमुळे दोन्ही अभिनेत्रींनी यात जीव ओतून काम केलं. मात्र सिनेमा रिलिज झाला तेव्हा स्मिता पाटील महेश भट्ट यांच्यावर वैतागल्या.

महेश भट्ट-स्मिता पाटील यांचं भांडण का?

सिनेमातली स्मिता पाटील यांच्यावर चित्रित करण्यात आलेली दृश्यं एडिटिंग टेबलवर कापण्यात आली होती. तसंच सिनेमात शबाना आझमी यांना जास्त फुटेज दिलं गेलं आहे असंही स्मिता पाटील यांचं म्हणणं होतं. त्यामुळे या दोघांमध्ये भांडण झालं होतं. तसंच महेश भट्ट यांनी आपली फसवणूक केली आहे असंही स्मिता पाटील बोलून गेल्या होत्या. महेश भट्ट यांच्याशी बोलणंही त्यांनी सोडून दिलं होतं. कारण तो काळ असा होता ज्या काळात स्मिता पाटील आणि शबाना आझमी या जवळपास प्रत्येक समांतर सिनेमांमध्ये झळकत होत्या. त्यांच्यात शीतयुद्ध सुरु होतं. त्यामुळेच शबाना आझमींना जास्त फुटेज दिलं गेल्याने स्मिता पाटील वैतागल्या होत्या. मात्र महेश भट्ट यांनी त्यांची समजूत घातली. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांना ते पटलं आणि त्यांनी महेश भट्टशी पुन्हा संवाद सुरु केला.

शबाना आझमींनी स्मिता पाटील यांच्या विषयी काय म्हटलं होतं?

समांतर सिनेमात स्मिता पाटील आणि माझ्यात कायमच तुलना व्हायची. त्यावेळच्या पत्रकारांनी आमच्या स्पर्धेवर चवीने लेखही लिहिले होते. त्यामुळे आम्ही कधीही मैत्रिणी होऊ शकलो नाही. मात्र आम्ही दोघीही एकमेकींच्या घरातल्यांचा आणि एकमेकींचा खूप आदर करत होतो. स्मिता खूप लवकर गेली. आजही मला मी तिच्याबद्दल जे वाईटसाईट बोलले आहे त्याचा पश्चात्ताप वाटतो. पण आम्हा दोघींचेही आमच्या एकमेकींच्या कुटुंबीयांशी खूप चांगले संबंध होते. तुम्ही असंही म्हणू शकता की माझं नाव शबाना पाटील आणि तिचं नाव स्मिता आझमी ठेवलं असतं तरीही काही फरक पडला नसता असं शबाना आझमींनी कोमल नहाटाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.

shabana azmi about smita patil
शबाना आझमी, स्मिता पाटील

अर्थ या सिनेमानंतर जे घडलं तसंच एका व्यावसायिक सिनेमानंतरही झालं. अमिताभ बच्चन यांच्यासह केलेलेल्या सिनेमातल्या एका गाण्यानंतरही स्मिता पाटील यांना पश्चात्ताप झाला होता. अमिताभची अँग्री यंग मॅनची इमेज ८० च्या दशकात भरात होती. त्याच्यासह सिनेमा करण्यासाठी दिग्दर्शक, नायिका तरसत असत. स्मिता पाटील यांनी अमिताभ बच्चनबरोबर दोन चित्रपटांमध्ये काम केलं. एक होता ‘शक्ती’, दुसरा होता ‘नमक हलाल.’ या सिनेमातल्या एका गाण्यावरुन स्मिता पाटील या स्वतःवरच वैतागल्या होत्या.

नेमकं काय घडलं होतं?

नमक हलाल हा प्रकाश मेहरांनी अमिताभ, स्मिता पाटील यांच्यासह केलेला व्यावसायिक सिनेमा होता. अमिताभ म्हटलं की सिनेमा सुपरहिट होणार हे तेव्हाचं गणित होतंच. याच सिनेमात अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यावर पावसात भिजलेलं एक गाणं चित्रित करण्यात आलं. या गाण्याचे बोल होते ‘आज रपट जाये तो..’ या गाण्यात स्मिता पाटील आणि अमिताभ यांचा पावसातला रोमान्स दाखवण्यात आला होता. जो काळ सुरु होता त्या काळाचा विचार केला तर हे गाणं बोल्ड आणि धाडसी ठरलं. हे गाणं शूट करुन आल्यानंतर स्मिता पाटील आपल्या आईच्या कुशीत शिरुन रात्रभर हमसून हमसून रडत होत्या. अमिताभसह पावसातलं हे गाणं आपण करायला नको होतं असं त्यांना वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी त्या सेटवर गेल्या तरीही शांत आणि उदासच होत्या. स्मिता पाटील यांना गाणं शूट झाल्यानंतर हे असं वाटतंय हे जेव्हा अमिताभ बच्चन यांना कळलं तेव्हा त्यांनी स्मिता पाटील यांची भेट घेतली. ‘आज रपट जाये..’ हे गाणं स्क्रिप्टची गरज होती हे त्यांना समजावून सांगितलं.

Smita patil and Amitabh
नमक हलालमधल्या गाण्यामुळे स्वतःवरच वैतागल्या होत्या स्मिता पाटील (फोटो सौजन्य-फेसबुक)

अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यातली मैत्री घट्ट झाली

अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यातली मैत्री या प्रसंगानंतर घट्ट झाली. स्मिता पाटील यांनी पुढचं शुटिंग अत्यंत आनंदात केलं. ‘नमक हलाल’ हा प्रकाश मेहरा दिग्दर्शित सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर तो सुपरहिट ठरला. स्मिता पाटील आणि अमिताभ यांनी ज्या दोन सिनेमांमध्ये काम केलं ते अजूनही लोकांच्या स्मरणात आहे आणि ज्या गाण्यासाठी त्या रडल्या होत्या त्यातली केमिस्ट्रीही स्मरणात आहे.

स्मिता पाटील यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात चरणदास चोर या सिनेमापासून केली होती. शाम बेनेगल दिग्दर्शित हा सिनेमा चर्चेत राहिला होता. १९७५ मध्ये आलेल्या या सिनेमानंतर पुढच्या दहा वर्षातच अनेक समांतर सिनेमांमध्ये स्मिता पाटील यांनी भूमिका केल्या. १९८५ मध्ये स्मिता पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. १७ ऑक्टोबर १९५५ या दिवशी जन्मलेल्या स्मिता पाटील यांचं आयुष्य अवघं ३१ वर्षांचंच होतं. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वेगळ्या धाटणीचा सशक्त अभिनय, सावळा रंग असूनही रेखीव चेहरा, साडी किंवा ड्रेसवर लावलेलं कुंकू या सगळ्यामुळे त्यांची छाप पडत असे. राज बब्बर यांचा विवाहित होते तरीही त्यांच्या प्रेमात स्मिता पाटील पडल्या होत्या.

विवाहित असलेल्या राज बब्बरच्या प्रेमात पडल्या होत्या स्मिता पाटील

स्मिता पाटील यांची आणि राज बब्बरची भेट ‘भिगी पलके’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. राज बब्बर यांनी तेव्हा त्यांच्या पत्नीला सोडलं आणि ते स्मिता पाटीलसह लिव्ह इन मध्ये राहू लागले होते. त्यावेळी या नात्याला लिव्ह-इन वगैरे म्हणतात हे फारसं रुजलेलं नव्हतं. त्यामुळे ८० च्या दशकात राज बब्बर यांना मोठ्या प्रमाणावर टीकाही सहन करावी लागली. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांनी लग्नही केलं. मात्र स्मिता पाटील यांचा हा निर्णय त्यांच्या आई वडिलांना मुळीच आवडला नव्हता.

राज बब्बर आणि स्मिता पाटील लग्नानंतर एकत्र राहू लागले होते. पण त्यांच्यात खटके उडू लागले. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांना एक मुलगाही झाला ज्याचं नाव प्रतीक बब्बर असं आहे. जो आत्ता अभिनय करतो. राज बब्बर हे स्मिताशी भांडणानंतर आपल्या पत्नीकडे परतले. मुलाचा जन्म झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला.

Smita Patil
स्मिता पाटील यांच्या अभिनयाने सजलेले चित्रपट आजही आपल्या स्मरणात आहेत. (फोटो-फेसबुक)

स्मिता पाटील यांनी वृत्तनिवेदक म्हणूनही केलं काम

सिनेमात येण्यापूर्वी स्मिता पाटील यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणूनही काम केलं. स्मिता पाटील यांनी जशी हिंदी सिनेसृष्टी गाजवली अगदी त्याचप्रमाणे मराठीतही त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप सोडली. ‘सामना’, ‘जैत रे जैत’, ‘उंबरठा’ या सिनेमातल्या त्यांच्या भूमिका आजही आपल्याला आठवतात. नोकरीसाठी नवऱ्याचं घर सोडून हॉस्टेलवर व्यवस्थापिका म्हणून येणारी ‘उंबरठा’तली ‘सुलभा महाजान’. तिचं एकाकी असणं, तिचं ‘सुन्या सुन्या मैफिली’त म्हणणं, महिलांचं वसतिगृह तिथे असलेल्या विविध समस्या यांच्याशी लढा देणारी सावित्री ही तशी प्रवाहाच्या विरोधात जाणारी भूमिका ठरली. स्मिता पाटीलने अशी भूमिका करणं हे अनेकांना तेव्हा पटलंही नव्हतं. मात्र आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी उंबरठातली सावित्री जिवंत केली.

मराठी सिनेमांमध्येही अभिनयाचा दमदार ठसा उमटवला

जी गोष्ट उंबरठाची तिच गोष्ट ‘जैत रे जैत’चीही. नवऱ्याचं पटलं नाही म्हणून काडीमोड घेणारी, ‘नाग्या’ आवडतो म्हणून त्याच्या प्रेमात रंगणारी, मी रात टाकली, मी कात टाकली म्हणणारी चिंदी साकारणं हे देखील धाडसाचंच होतं. आता अशा भूमिका एखाद्या अभिनेत्रीने केल्या तर त्याचं फारसं काही वाटत नाही. त्या काळात स्मिता पाटील यांना टीकाही सहन करावी लागली. मात्र कुठल्याही टीकेची पर्वा न करता त्या सिनेमाच्या दुनियेत स्वच्छंदीपणाने वावरत होत्या. स्मिता पाटील नावाचं स्वप्न हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीला पडलं असं वाटावं असाच त्यांचा अभिनय आहे. त्यांच्या विविध भूमिकांमधून त्या आपल्यात आहेत आणि आपल्यात असतील.

Story img Loader