बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘टायगर ३’ नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. लवकरच हा चित्रपट कमाईच्या बाबतीत ३०० कोटींचा टप्पा पार करेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात सलमानचं कौतुक होतच आहे, पण त्याबरोबरच यात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या इमरान हाश्मीही प्रचंड चर्चा आहे. इम्रानचं काम लोकांना पसंत पडलं आहे.

‘टायगर ३’मध्ये सलमान खानसह काम केल्यावर आता इमरानने शाहरुख खानबरोबर काम करायची इच्छाही व्यक्त केली आहे. दरम्यान एका मुलाखतीदरम्यान शाहरुखच्या वाढदिवसाच्या पार्टीबद्दलही इमरानने भाष्य केलं आहे. नुकतंच २ नोव्हेंबरला शाहरुखने त्याच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त एका जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. ‘जवान’च्या यशानंतर शाहरुखने त्याचा हा वाढदिवस दणक्यात साजरा केला.

Mamta Kulkarni
सलमान-शाहरुख खानने ममता कुलकर्णीच्या तोंडावर दरवाजा केलेला बंद; म्हणाली, “गुडघ्यावर बसून ५,००० लोकांमध्ये…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Salman Khan And Shahrukh Khan
राकेश रोशन गाढ झोपेत असताना सलमान-शाहरूख खान त्यांच्या खोलीबाहेर गोळीबार…; दिग्दर्शक म्हणाले, “त्यांची सीमारेषा…”
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
Bharti Singh
Video : शाहरुख खानचं ‘ते’ कृत्य पाहून भारती सिंगला अश्रू झाले अनावर; किस्सा सांगत म्हणाली…
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”

या पार्टीत वेगवेगळे सेलिब्रिटीज, बॉलिवूड कलाकार तसेच उद्योगपती यांनी हजेरी लावली होती. याच सेलिब्रिटीजच्या यादीत इमरान हाश्मीचंही नाव होतं. इमरान त्या पार्टीत उपस्थित होता, परंतु काही कारणास्तव तो त्या पार्टीतून लवकर निघाला. एवढ्या मोठ्या सुपरस्टारच्या पार्टीतून लवकर निघण्याबद्दल इमरानल विचारल्यावर त्याने सांगितलेलं कारण ऐकून तुम्हाला हसूच येईल.

आणखी वाचा : प्लॅस्टिक म्हणजे ऐश्वर्या राय असं उत्तर ‘कॉफी विथ करण’मध्ये देणाऱ्या इमरान हाश्मीचं वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “तुमचे शत्रू…”

शाहरुखच्या पार्टीत नेमकी धमाल न येण्यामागील कारण इमरानने सांगितलं आहे. इमरानला पार्टी करणं फार आवडत नाही, तसेच रात्रीचं जागरण आवडत नसल्याने आणि दारू घेत नसल्याने तिथे थांबण्यात काहीच अर्थ नसतो असं इमरानने ‘झुम’शी संवाद साधताना सांगितलं. यामुळेच शाहरुखच्या पार्टीचा जास्त आनंद घेऊ न शकल्याने इमरानने तिथून काढता पाय घेतल्याचं स्पष्ट केलं.

याबरोबरच कोविडनंतर इमरानने स्वतःच्या दैनंदिन जीवनात बराच बदल केल्याचं स्पष्ट केलं आहे. सकाळी ६ वाजता उठायची सवय लागल्याने आपसूकच रात्री लवकर झोपायची सवय त्यानेच स्वतःला लावून घेतली आहे, यामुळेच इमरानने किंग खानची पार्टी अर्धवट सोडल्याचं स्पष्ट झालं आहे. याबरोबरच आपल्याच चित्रपटाच्या स्क्रीनिंगलाही जाणं इमरानला पसंत नसल्याचं त्याने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

Story img Loader