कंगना रणौत ही तिच्या लाजवाब अभिनय आणि बेधडक स्वभावामुळे बऱ्याचदा चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटीजम आणि माफियाबद्दल उघडपणे भाष्य करायला सुरुवात केली. याबरोबरच कंगना तिची राजकीय मतंदेखील परखडपणे मांडत असते. याबरोबरच चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांबद्दलही कंगना भाष्य करताना आढळते.

कंगना सध्या तापसी पन्नू व स्वरा भास्करबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगना या दोन्ही अभिनेत्रींना ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हंटलं होतं. नुकतंच तिने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. कंगना सध्या ‘तेजस’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान ‘टाइम्स नाऊ नवभारत’शी संवाद साधताना कंगनाने यावर भाष्य केलं आहे.

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

आणखी वाचा : ‘राम-लीला’मधील ‘त्या’ किसिंग सीनबद्दल रणवीर-दीपिकाचा मोठा खुलासा; ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर सांगितला किस्सा

कंगनाने तापसी व स्वराच्या बाबतीत असं भाष्य का केलं याबद्दल बोलताना ती म्हणाली, “तापसी एकदा म्हणालेली की मला मुखवट्यांची गरज आहे, त्यावेळी तीच स्वतः प्रचंड स्ट्रगल करत होती. २०१६ मध्ये तिला प्रथम यश मिळालं. त्यावेळी तिने माझ्याबद्दल असं वक्तव्य केलं होतं अन् त्यावर माझ्या बहिणीने तिला उत्तर दिलं होतं की तापसी ही कायम कंगनाला कॉपी करते, तिने नाकारलेले चित्रपटच तापसी करते.”

कंगना पुढे म्हणाली, “आज त्या दोघींचं करिअर खरंतर माझ्यामुळेच सुरू आहे आणि यश मिळालं आहे, त्यामुळे त्यांना माझ्याबद्दल वक्तव्य करायला नको होतो. माझ्या बहिणीने त्यांना उत्तर दिलं खरं पण मी मात्र त्यांना फारशी किंमत दिली नाही, त्यांना मिळालेलं यश पाहून मी खुश आहे.” कंगनाचा आगामी चित्रपट ‘तेजस’ २७ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader