‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा हिंदी सिनेसृष्टीतील एक माईलस्टोन सिनेमा आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. मराठा मंदिर या चित्रपटगृहात या सिनेमाने २४ वर्षांपेक्षा जास्त काळ पूर्ण केला. राज (शाहरुख खान) आणि सिमरन (काजोल) यांची लव्हस्टोरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना भुरळ घालते आहे. यातील गाणीसुद्धा आजही लोक आवडीने ऐकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या मराठा मंदिरमध्ये हा चित्रपट आजही सुरू आहे. पण तुम्हाला माहितीये का की, या चित्रपटात मराठमोळा अभिनेता मिलिंद गुणाजी यांची महत्त्वाची भूमिका होती. काही कारणास्तव मिलिंद गुणाजी यांना ह्या चित्रपटासाठी नकार द्यावा लागला अन् त्याची खंत त्यांना आजही वाटते. ती भूमिका नेमकी कोणती होती अन् ती मिलिंद यांनी का नाकारली याबद्दल त्यांनी नुकतंच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.

आणखी वाचा : रणवीर सिंग करणार भन्साळींच्या ‘या’ चित्रपटातून धमाकेदार कमबॅक; YRF ने साथ सोडल्यावर अभिनेत्याबद्दल मोठी अपडेट

चित्रपटात काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिकेसाठी मिलिंद गुणाजी यांना विचारण्यात आलं होता. ‘बॉलिवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिलिंद गुणाजी म्हणाले, “जेव्हा मला ‘डीडीएलजे’साठी विचारण्यात आलं तेव्हा त्या पात्राला दाढी नको होती हे निर्मात्यांच्या डोक्यात अगदी स्पष्ट होतं. त्यावेळी मी ३ ते ४ चित्रपटात काम करत होतो ज्यात मला दाढी ठेवावी लागणार होती. मला खरंच ती भूमिका करायला मिळाली नाही याचं वाईट वाटतं.”

आणखी वाचा : “त्यांना आरसा दाखवायला हवा…” बॉलिवूड स्टार्सच्या अव्वाच्या सव्वा मानधनावर समीक्षक तरण आदर्श स्पष्टच बोलले

मिलिंद गुणाजी यांच्या ऐवजी ही भूमिका परमीत सेठी यांनी निभावली. हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने शाहरुख आणि काजोल ही जोडी लोकप्रिय झाली आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. याबरोबरच यात अनुपम खेर, अमरिश पुरी, फरीदा जलाल, सतीश शाह, करण जोहरसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why milind gunaji lost the important role in shahrukh khan and kajol starrer ddlj avn
Show comments