आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे मराठमोळे नाना पाटेकर होय. नाना यांनी अनेक सुपरहिट हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे नाना वैयक्तिक आयुष्यात मात्र फारसे नशीबवान राहिले नाहीत. नाना विवाहित असूनही एकटे राहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – राहत्या घरात मृतावस्थेत आढळली प्रसिद्ध अभिनेत्री

‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, नाना पाटेकर थिएटर करत असताना नीलकांती नावाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. नीलकांती बँकेत अधिकाऱ्या होत्या, त्यांचा पगार २५०० रुपये महिना होता. त्याकाळी नाना एका शोमधून ५० रुपये कमावायचे. त्यावेळी दोघांची कमाई आनंदात जगण्यासाठी पुरेशी होती. दोघेही दर महिन्याला बचत करायचे. या दोघांचे लग्न अवघ्या ७५० रुपयांत झाले होते. इतकंच नाही तर ते पुण्याला हनिमूनसाठीही गेले होते. नीलकांती यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं होतं, पण त्यांनी नाना पाटेकरांना नेहमीच पाठिंबा दिला. नानांच्या अफेअरमुळे त्या वेगळ्या राहू लागल्या, असं म्हटलं जातं. नाना पाटेकर व नीलकांती यांना मल्हार हा मुलगा असून मागच्या अनेक वर्षापासून नाना आणि नीलकांती वेगळे राहतात.

Video: “हिंदू धर्मात काय वाईट होतं की तू इस्लाम स्वीकारला”? प्रश्न ऐकताच राखी सावंत गोंधळली; क्षणभर विचार केला अन्…

नाना पाटेकर यांचे दोन बॉलीवूड अभिनेत्रींशी अफेअर होते, असं म्हटलं जातं. त्यांचे अभिनेत्री मनीषा कोईरालाशी अफेअर होते. दोघेही बराच काळ लिव्ह-इनमध्ये राहिल्याचंही म्हटलं जातं. या अफेअरचे रुपांतर नात्यात होण्यापूर्वीच नाना पाटेकर दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले. ती अभिनेत्री होती आयेशा झुल्काव. आयेशाचंही नानांवर प्रेम होतं, असं म्हटलं जातं. पण मनीषा कोईरालाला ही गोष्ट समजल्यावर तिचं व आयेशाचं भांडण झालं. त्यानंतर काही अशा घटना घडल्या की दोघींचंही नानांशी ब्रेकअप झालं आणि नाना एकटे राहिले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why nana patekar live separate from his wife nilkanti patekar read love story hrc