अभिनेता अक्षय कुमारचा ‘OMG 2’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘ओ माय गॉड २’मध्ये अक्षय कुमार शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे, तर ‘ओ माय गॉड’मध्ये तो कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये परेश रावलऐवजी पंकज त्रिपाठी दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘ओह माय गॉड २’मधील व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांचा अक्षय कुमारला इशारा; म्हणाले, “हिंदू देवांचा…”

‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा पहिला भाग परेश रावल यांच्यामुळे सुपरहिट ठरला होता. मात्र या ‘ओह माय गॉड २’ मध्ये परेश रावल यांच्याऐवजी पंकज त्रिपाठींना घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याचे नेमकं कारण काय? असे प्रश्नही उपस्थित केले जात होते. मात्र अखेरीस या मागची काही कारण समोर आली आहेत.

हेही वाचा- “एक दिवस हा मुलगा…”; हेमा मालिनींच्या गुरुंनी शाहरुख खानबाबत केलेली भविष्यवाणी ठरली खरी; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, ‘ओह माय गॉड २’ मध्ये मुख्य भूमिकेसाठी परेश रावल हेच आमची पहिली पसंती होते. याबाबत निर्मात्यांनी त्यांच्याशी बातचीतदेखील सुरु केली होती. मात्र परेश रावल यांनी या भूमिकेसाठी बाजारमूल्यापेक्षा अधिक रक्कमेची मागणी केली. मात्र त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. अनेकदा प्रयत्न करुनही परेश रावल यांनी भूमिकेसाठी काहीही प्रतिसाद न दिल्याने अखेर पंकज त्रिपाठीला या चित्रपटाच्या मुख्य अभिनेता म्हणून घेण्यात आले अशा चर्चा सुरु होत्या.

मात्र, आता खुद्द परेश रावल यांनी या चर्चांवर मौन सोडलं आहे. परेश रावल यांनी ‘ओह माय गॉड २’ न करण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, मला ‘ओह माय गॉड २’ ची कथा आवडली नव्हती. तसेच माझ्या भूमिकेला घेऊन मी संतृष्ट नव्हतो. म्हणून मी या चित्रपटातून बाहेर पडलो. मला भूमिकेत एवढी मज्जा येत नव्हती. मी सांगितलेलं जर कुणाला या चित्रपटाचे सिक्वेल बनवायचं असेल तर ‘लगे रहो मुन्नाभाई’ सारखा असावा.”

हेही वाचा- “लग्न हा एक खेळ” अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा असं का म्हणाला?, पाहा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान ओह माय गॉड २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला इशारा दिला आहे. आशा आहे की हा चित्रपट हिंदू धर्माचा अनादर करणार नाही, अशा प्रकारच्या कमेंट्स यावर नेटकरी करत आहेत. अक्षयच्या लूकवर कमेंट न करता नेटकऱ्यांनी त्याला हिंदू धर्माचा अनादर न करण्यास सांगितलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why paresh rawal is not part of akshay kumar omg 2 movie know the true reason dpj