बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि त्यांचे करियर कायमच चर्चेचा विषय बनतो. काही अभिनेत्रींचे करियर अवघ्या एक दोन चित्रपटानंतर संपून जाते तर काही अभिनेत्री सातत्याने हिट चित्रपट देत असतात. अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या चर्चेत आहे. नुकताच तिचा कोड नेम हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. याआधी तिचे साईना, नमस्ते इंग्लंड, जबरिया जोडी या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही.

‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये परिणीतीने या सगळ्याचा खुलासा केला. शिवाय तिने रणबीर कपूरबरोबरचा चित्रपट नाकारल्याचंही कारण सांगितलं. रणबीरच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात परिणीती मुख्य भूमिकेत दिसणार होती, पण तिने ही भूमिका नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे. याविषयी बोलताना परिणीती म्हणाली, “या गोष्टी घडत असतात, या आपल्या जीवनाचा एक भाग आहेत, असे निर्णय आपल्या सगळ्यांनाच कधीतरी घ्यावे लागतात. तुम्हीसुद्धा तुम्हाला जो योग्य वाटेल तोच निर्णय घेता, त्यामुळे यात काहीच नावीन्य नाही.”

आणखी वाचा : “ही तर दीपिका…” मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सुहाना खानला पाहून नेटीजन्स गोंधळले

रणबीरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर आहे. ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंग’चे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. हिंदीबरोबरच इतरही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परिणीतीने ही भूमिका नाकारल्याने आता रश्मिका मंदाना या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. रश्मिकाने नुकतंच अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘गुडबाय’ चित्रपटातून हिंदीत पदार्पण केलं आहे.

परिणीती आता राजश्री प्रॉडक्शनच्या ‘उंचाई’ चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. परिणीतीच्या बरोबरीने अमिताभ बच्चन, अभिनेता बोमन इराणी, अभिनेत्री नीना गुप्ता, सारिका, डॅनी डेंग्झोपा, नफीसा अली यांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader