आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन यांचा ‘३ इडीयट्स’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आजही हा चित्रपट कुठे टीव्हीवर लागला असेल तर तो पूर्ण बघितल्याशिवाय टीव्हीसमोरून न हालणारी लोकही आहेत. भारतीय शिक्षण पद्धती आणि इंजिनियरिंगला असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या या चित्रपटातून एका हटके पद्धतीने दाखवण्यात आल्या होत्या. हा चित्रपट पाहताना आजही आपण लोटपोट होऊन हसतो आणि तितकंच ढसाढसा रडतोदेखील. राजकुमार हिरानी यांनी एक अजरामर कलाकृती या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या चित्रपटातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांचं आवडतं आहे, त्यापैकी करीना कपूरच्या होणाऱ्या नवऱ्याचं पात्र सुहास हे तर प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. या पात्राचे प्रचंड मीम्सदेखील व्हायरल झाले आहेत, प्रत्येक गोष्ट पैशात तोलणाऱ्या या सुहासची संपूर्ण चित्रपटात खिल्ली उडवली गेली आहे. यातील एका सीन दरम्यान ४ लाख रुपयांचं घडयाळ हरवल्यामुळे सुहास प्रचंड भडकताना दाखवला आहे, पण आता याच सुहासची लोक सोशल मीडियावर जाहीरपणे माफी मागताना दिसत आहेत.

आणखी वाचा : Photos : बाहुबलीमधील ‘देवसेना’ आहे तरी कुठे? सलग फ्लॉप चित्रपट देणारी अनुष्का शेट्टी कमबॅक करणार का?

नेमकं प्रकरण काय?

एका ट्विटर युझरने ‘सुहास’ या ‘३ इडियट’मधील पात्राला एक खुलं पत्र लिहिलं आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या पत्रातून सुहासची खिल्ली उडवण्याबद्दल जाहीरपणे माफी मागण्यात आलेली आहे. आर्यांश या ट्विटर युझरने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की,

“सुहास, मी तुझ्यावर लहानपणापासून खूप हसलो, पण आता मी मोठा झालो आहे. मला जाणीव झाली आहे की तूसुद्धा एक चांगला माणूस आहेस. ज्या ४ लाख रुपयांच्या घड्याळासाठी तुम्ही इतके कष्ट घेतले आहेत ते जर कुणी असंच हरवलं तर कोणाचंही डोकं फिरेल. आता मला जाणवतंय की ४०० डॉलर्सचे बूट खराब झाले तर नेमकं कसं वाटतं? सगळेच पैशाच्या मागे धावतात, तूदेखील काही वेगळं केलेलं नाहीस त्यामुळे तू चुकीचा नव्हतास.
या सगळ्या गोष्टी तू स्वतःच्या कष्टाने कामावल्या होत्या म्हणून तुला त्यांची किंमत ठाऊक होती. मी तुझा स्ट्रगल समजू शकतो. लग्नाच्या दिवशी दीड लाख रुपयांच्या शेरवानीवर चटणी सांडणं आणि त्याच मंडपातून तुझ्या होणाऱ्या बायकोला पळवून नेण अजिबात मजेशीर नव्हतं. तू हीरो होतोस.”

आर्यांशची ही ट्विटर पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्यावर वेगवेगळ्या लोकांनी त्यांची मतं मांडली. ही पोस्ट चक्क सुहास ही भूमिका साकारणाऱ्या ओलिवियर लैफॉ या अभिनेत्यापर्यंत पोहोचली. ओलिवियर हा एक फ्रेंच अभिनेता आहे शिवाय तो हिंदी चित्रपटातही काम करतो.

त्याने आर्यांशची पोस्ट शेअर करत लिहिलं, “गेल्या काही दिवसांपासून मला माफी मागण्याचे मेसेज येत आहेत. काही वर्षांपूर्वी ‘३ इडियट’मधील मनमी साकारलेल्या सुहास टंडन या पात्राची खिल्ली उडवल्याबद्दल लोक मला मेसेज करत आहेत. नुकतीच मी आर्यांशची पोस्टही पाहिली. या पोस्टमधून त्याला पैशांचं महत्त्व पटलं आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. चित्रपट आणि त्यातील पात्रं ही तुमच्यावर तेव्हाही प्रभाव टाकतात आणि आत्ताही. अखेर सुहासवर सुद्धा लोक प्रेम करत आहेत ही फार सुखद बाब आहे.”

या फ्रेंच अभिनेत्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ओलिवियर लैफॉ याने याआधी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गुजारिश’ या चित्रपटातही काम केलं आहे.