बॉलीवूडचे कलाकार हे जितके त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात, तितकेच त्यांच्या खासगी आयुष्याची वेळोवेळी चर्चा होताना दिसते. राज कपूर(Raj Kapoor) हे बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेते होते. त्यांचा चाहतावर्ग मोठा होता. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांबरोबरच त्यांच्या रिलेशनशिपची मोठी चर्चा झाली. नर्गिसपासून वैजयंतीमाला या अभिनेत्रींची नावे त्यांच्याबरोबर जोडली गेली. विशेष बाब म्हणजे लग्न झाल्यानंतरही ते त्यांच्या सहअभिनेत्रींबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. याबद्दल ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. ऋषी कपूर यांची आई एकदा घर सोडून हॉटेलमध्ये राहण्यास गेली होती, असा खुलासा ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात केला आहे. इतकेच नाही तर राज कपूर हे एकदा स्वत:च याबद्दल बोलले होते.

मी कधीच माझ्या पत्नीला अभिनेत्री बनवण्याचा…

राज कपूर यांनी कोणत्याही अभिनेत्रीचे नाव न घेता त्यांच्या अफेअरबद्दल सांगितले होते. नर्गिस यांच्याबरोबर राज कपूर यांची पहिली भेट ती १६ वर्षांची असताना झाली होती. त्यावेळी राज कपूर यांचे कृष्णा मल्होत्रा यांच्याबरोबर लग्न झाले होते. त्यांना मुलेही होती. पण, या भेटीचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की त्यांनी तशी गोष्ट ‘बॉबी’ या चित्रपटातून दाखविली. १९७३ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

प्रसार भारतीने राज कपूर यांच्यावर आधारित प्रदर्शित केलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी म्हटलेले, “ती खूप लहान होती, देवदुतासारखी होती, उत्तम अभिनेत्री होती. माझ्यासाठी चित्रपट म्हणजे समर्पण, भक्ती होते; त्यामुळे त्याभोवती असणारी व्यक्ती माझ्या अस्तित्वाचा भाग बनत असे. मी नक्कीच म्हणू शकतो की आज जे आरके स्टुडिओ आहे, त्यामध्ये तिचे (नर्सिग) मोठे योगदान आहे. “

पुढे त्यांनी नर्गिस यांच्याबरोबर कधीही लग्न करण्याचा हेतू नसल्याचे सांगत म्हटले, “अगदी सुरुवातीपासून मी एक रेषा आखली होती. माझ्यासाठी हे स्पष्ट होते की, माझी पत्नी ही अभिनेत्री नाही आणि माझ्याबरोबर काम करत असलेली अभिनेत्री ही माझी पत्नी नाही. माझ्या मतानुसार पत्नीचा अर्थ असा की, जी माझ्या मुलांची आई आहे, त्यामुळे माझे कौटुंबिक आयुष्य हे दुसरीकडे कुठेतरी दूर आहे. दुसरीकडे अभिनेत्री असे, जी माझ्या सर्जनशीलतेत भर टाकत असे. ते तिच्यासाठी समाधानकारक असे. मी कधीच माझ्या पत्नीला अभिनेत्री बनवण्याचा किंवा अभिनेत्रीला पत्नी बनवण्याचा प्रयत्न केला नाही. “

राज कपूरचे यांचे नर्गिसवर इतके प्रेम असून जेव्हा अभिनेत्रीला समजले की ते त्यांच्या पत्नी कृष्णा यांना सोडणार नाहीत. त्यानंतर नर्गिस यांनी १९५८ मध्ये सुनिल दत्ता यांच्याबरोबर लग्न केले. राज कपूर यांना नर्सिगने त्यांचा विश्वासघात केला आहे, असे वाटले. एकदा राज कपूर यांनी पत्रकार सुरेश कोहली यांना सांगितले होते की मी नर्गिसला फसवले असे मला संपूर्ण जग सांगते. मात्र, नर्गिसने माझा विश्वासघात केला आहे.

‘द कपूर्स : द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा’ या पुस्तकानुसार, “जेव्हा राज कपूर यांना समजले की नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याबरोबर लग्न केले आहे, त्यावेळी त्यांना खूप वाईट वाटले. ते त्यांच्या मित्रांसमोर रडले. राज कपूर यांना या गोष्टीचा इतका धक्का बसला होता की ते स्वत:ला पेटलेल्या सिगारेटने चटके देऊन ते जे नर्गिसच्या लग्नाबद्दल ऐकत आहेत, ते सत्य की असत्य आहे, याची खात्री करत असत. ते स्वप्न तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी ते स्वत:लाच चटके देत असत. नर्गिस असे कसे करू शकते, याचे त्यांना आश्चर्य वाटत असे.”

ऋषी कपूर यांनी त्यांच्या खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रात लिहिले की, माझ्या वडिलांचे नर्गिसजींसोबत प्रेमसंबंध होते, तेव्हा मी खूप लहान होतो आणि त्यामुळे माझ्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मलाही घरी काहीही चुकीचे झाल्याचे आठवत नाही. पण, मला आठवते की जेव्हा वडील वैजयंतीमाला यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा मी माझ्या आईबरोबर घर सोडून काही दिवसांसाठी मरीन ड्राइव्हवरील नटराज हॉटेलमध्ये राहायला गेलो होतो.”

Story img Loader