सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या अभिनयाइतकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. रेखा यांचं अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचं रिलेशनशीप आणि त्यांचे लग्न याबद्दल खूप चर्चा होतात. रेखा त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी होत्या पण त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र अशांततेने भरलेले होते. रेखा यांनी दिल्लीचे बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्नही केले होते. पण लग्नानंतर काही दिवसांतच मुकेश यांनी आत्महत्या केली.
हेही वाचा- “मला ‘जान’ म्हणण्याचा अधिकार…”; सलमान खानचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “तिला आय लव्ह यू…”
१९९० मध्ये रेखा आणि मुकेश यांनी केलं लग्न
मुकेश अग्रवाल यांनी रेखा १९९० मध्ये पहिल्यांदा भेटले दोघांमध्ये आधी बोलणं झाले. मग भेटीगाठी वाढत गेल्या. कालांतराने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पहिल्या भेटीनंतर एक महिन्यानंतर म्हणजेच ४ मार्च १९९० रोजी मुकेश यांनी रेखा यांना प्रपोज केले आणि त्याच रात्री मुकेश आणि रेखा यांनी जुहूच्या मुक्तेश्वर देवालय मंदिरात जाऊन लग्न केले.
लग्नाच्या काही दिवसानंतर दोघांमध्ये दुरावा
मात्र, लग्नाच्या काही दिवसांनी रेखाच्या वैवाहिक जीवनात मोठे वादळ आले. रेखाचे पती मुकेश डिप्रेशनचे शिकार झाले होते. मुकेश यांनी रेखाला चित्रपटसृष्टी सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. हळूहळू रेखा आणि मुकेश यांच्यातील अंतर वाढत गेले. आणि लग्नानंतर काही महिन्यांनीच त्यांच्या नात्यात दुरावा आला.
हेही वाचा- “मी आलियासाठी चांगला पती नाही”; लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी रणबीर कपूरने केलेले वक्तव्य चर्चेत
लग्नाच्या ७ महिन्यानंतर मुकेश यांनी घेतला गळफास
रेखा आणि मुकेश यांच्यामध्ये अनेकदा वादावादी आणि मारामारी झाली. दोघांनाही एकमेकांबरोबर राहणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. लग्नाच्या ६ महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबर १९९० मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. २६ सप्टेंबर रोजी रेखा एका स्टेज शोमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेल्या होत्या. २ ऑक्टोबर १९९० रोजी मुकेश यांनी त्यांच्या फार्महाऊसमध्ये रेखाच्या ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवले. मुकेश यांनी मृत्यूपूर्वी सुसाईड नोटही लिहिली होती. मात्र, आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे त्यांने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
मुकेश यांनी आपल्या मृत्यूसाठी कोणालाच जबाबदार धरले नव्हते. मात्र, लोक त्यांच्या मृत्यूसाठी रेखालाच जबाबदार धरू लागले. परिणामी रेखाला खूप अपमान सहन करावा लागला. त्या काळात प्रदर्शित झालेल्या रेखाच्या ‘शेषनाग’ या चित्रपटाच्या पोस्टर्सनाही काळे फासण्यात आले होते. रेखाला पतीची मारेकरी म्हटले जात होते. एवढा अपमान सहन करून रेखा मुकेशच्या अंत्यसंस्कारालाही आल्या नाहीत.
मुकेश यांच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी रेखांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “जर दोन लोक एकत्र आनंदी नसतील तर घटस्फोट घेण्यात काही नुकसान नाही”. मुकेश यांच्या मृत्यूला आपण जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर रेखा यांनी पुन्हा लग्न केले नाही.