सलमान खानचे वडील लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांची जोडी ७० च्या दशकात खूप प्रसिद्ध होती. या जोडीने ‘शोले’, ‘जंजीर’, ‘डॉन’ आणि ‘शान’सह सुमारे २३ चित्रपटांच्या स्क्रिप्ट एकत्र लिहिल्या होत्या. पण एके दिवशी अचानक ही जोडी तुटली, त्यानंतर प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. मात्र, सलीम आणि जावेद याबाबत बोलणं पसंत करत नाहीत. आज जावेद अख्तर यांच्या वाढदिवसानिमित्त या जोडीच्या तुटण्याचं कारण काय होतं ते जाणून घेऊया. यामागचं खरं कारण एका चॅट शोमध्ये खुद्द सलीम खान यांनी सांगितलं होतं.

जावेद अख्तर यांनीच वेगळं व्हायचं आहे, असं म्हटलं होतं. ते ऐकून सलीम खान यांना धक्का बसला होता. जावेद यांच्याबरोबरचं नातं तुटण्याच्या प्रश्नावर सलीम म्हणाले होते, “प्रत्येक डब्ब्यावर एक्सपायरी लिहिलेली असते, कदाचित या नात्याची तारीखही लिहिली असेल. माझ्यावर विश्वास ठेवा, वेगळं व्हावं, ही जावेद यांची कल्पना होती. आजही पती-पत्नी, जोडीदार वेगळे होतात. प्रत्येकाचं स्वतःचं मत असतं,” असं सलीम खान यांनी सांगितलं होतं.

shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”

ऑस्करसाठी ‘RRR’ ऐवजी ‘छेल्लो शो’ची निवड का झाली? ज्युनिअर एनटीआर कारण सांगत म्हणाला, “तिथं बसलेल्या…”

सलीम खान पुढे म्हणाले, “एक दिवस आम्ही काम करत होतो. त्याने (जावेद) मला वेगळं व्हायचं आहे, असं सांगितलं. मला वाटलं की मी नीट ऐकलं नाही. तेव्हा त्याने मला वेगळं होऊन काम करायचं आहे, असं सांगितलं. त्यावर मी म्हणालो की तू हा विचार पाच मिनिटांपूर्वी केला नसेल. तर तो म्हणाला की ‘मी खूप दिवसांपासून विचार करत होतो.”

सुशांतसिंह राजपूतचा पाळीव श्वान ‘फज’चं निधन, ट्वीट करत बहीण म्हणाली, “मित्राबरोबर स्वर्गात…”

सलीम खान यांनी सांगितलं, “मी माझ्या घरी येण्यासाठी गाडीजवळ येऊ लागलो. तो मला सोडायला बाहेर येऊ लागला म्हणून मी त्याला थांबवलं आणि म्हटलं की मी स्वतःला सांभाळू शकतो. मी घरी आलो आणि मी हे कोणालाही सांगितलं नाही. त्याच दिवशी संध्याकाळी मला हेलनचा फोन आला की तिची आई खूप आजारी आहे. मी तिकडे जायला निघालो, मी पोहोचलो, तेव्हापर्यंत त्यांचं निधन झालं होतं. पण तरीही मी हे कोणालाही सांगितलं नाही. पण मला काही लोकांचे फोन येऊ लागले की तुमची जोडी तुटली का? यानंतर मी जावेदला फोन केला आणि विचारलं की तू ही बातमी लीक केली आहे का? तो म्हणाला की, माझ्या काही जवळच्या मित्रांना हे माहित होते, कदाचित त्यांनी काहीतरी सांगितलं असावं. त्यानंतर एका आठवड्याने याची अधिकृत घोषणा आम्ही केली होती.”

Video: “मैने ‘इस्लाम’ कबूल किया है”; राखी सावंतचा खुलासा

“मला त्यामागचं जे कारण समजलं ते हे होतं की त्याला गाणी लिहायची होती आणि मला त्यात रस नव्हता. जावेद म्हणायचा की आपण गाणी लिहू कारण गाण्यांमध्ये नावंही जातं. पण मी म्हणालो तू म्युझिक डायरेक्टरकडे जाणार आणि मी बसून राहीन, याचा माझ्या कामावरही परिणाम होईल. अशा रितीने आम्ही वेगळे झालो,” असं सलीम खान यांनी सांगितलं होतं.

Story img Loader