बॉलिवूड अभिनेता सलमान खान मागच्या काही काळापासून त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. लवकरच त्याचा ‘टायगर ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय मागच्या काही काळापासून सलमान खान दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूसह एका चित्रपटात काम करणार असल्याचं बोललं जात होतं. समांथा आगामी काळात सलमान खानच्या ‘नो एंट्री २’मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे या दोघांना स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र आता या चित्रपटात काम करण्यास सलमान खानने नकार दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीनुसार ‘नो एंट्री २’मध्ये १० अभिनेत्रींच्या महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये असणार आहेत असं बोललं जात होतं. त्यातील एक भूमिका समांथा साकारणार होती. पण आता या चित्रपटाला सलमान खाननेच नकार दिला आहे. चित्रपट काही आर्थिक समस्या आणि कायदेशीर अडचणीत अडकल्याने सलमान खानने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे समांथा आणि सलमानला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आणखी वाचा- …अन् रागाच्या भरात सनी देओलने फाडली होती स्वतःची पँट, वाचा नेमकं काय घडलं?

‘नो एंट्री २’च्या इतर स्टार कास्टबद्दल बोलायचं तर या चित्रपटात समांथा व्यतिरिक्त, पूजा हेगडे, रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया या अभिनेत्रींची नावंही महत्त्वपूर्ण भूमिकांसाठी चर्चेत होती. मात्र याबाबत निर्मिते किंवा कलाकारांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.

आणखी वाचा- “त्यांनी मला हॉटेलमध्ये बोलवलं अन्…” कास्टिंग काऊचबद्दल बोलताना नीना गुप्ता यांनी केला देव आनंद यांचा उल्लेख

दरम्यान सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात, ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर ३’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘टायगर ३’मध्ये तो कतरिना कैफसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर समांथा आगामी काळात ‘यशोदा’, ‘खुशी’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why salman khan say no for no entry film with samantha mrj