Karan Arjun Re Release : ‘करण अर्जुन’ या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाले असून यानिमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे . २२ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट पुनःप्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान आणि सलमान खान यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा त्यावेळी खूप गाजला. पण बॉलीवूडच्या या आयकॉनिक सिनेमात सुरुवातीला शाहरुख खानने काम करायला नकार दिला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

शाहरुखने सोडला होता चित्रपट

‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या कलाकारांबाबत बोलताना राकेश रोशन म्हणाले, “सुरुवातीला या चित्रपटात अजय देवगण आणि शाहरुख खानला घेण्यात आलं होतं. शाहरुख या चित्रपटातून बाहेर पडला, कारण त्याला अजय देवगणला जी भूमिका मिळाली ती भूमिका साकारायची होती, त्यामुळे तो बाहेर गेला. अजयनेही हा सिनेमा सोडला. त्याने हा सिनेमा का सोडला हे मला माहीत नाही. मी त्यानंतर सलमान खान आणि आमिर खान यांना चित्रपटात घेतलं. परंतु, नंतर शाहरुख परत आला आणि म्हणाला की, त्याला माझ्याबरोबर काम करायचं आहे. त्याने माझ्यावर विश्वास ठेवत चित्रपटासाठी होकार दिला.”

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Religion shouldnt justify reservation
इथे मुद्दा मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा नसून, आरक्षणाच्या निकषांचा आहे…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial
भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”

हेही वाचा…नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा

म्हणून शाहरुखने केला करण अर्जुन सिनेमा

राकेश रोशन पुढे म्हणाले, “शाहरुख परत आला आणि म्हणाला की, त्याला माझ्याबरोबर काम करायचं आहे, कारण मी पहिला निर्माता होतो ज्याने त्याला ‘किंग अंकल’मध्ये अभिनेता म्हणून साइन केलं होतं. तो म्हणाला, ‘मी रात्री झोपू शकलो नाही आणि मला या सिनेमाची कथा खूप आवडली नसली तरी मी तुमच्याबरोबर काम करेन. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.’ त्यानंतर मी आमिरला सांगितलं की, माझ्याकडे शाहरुखच्या पुढील महिन्याच्या तारखा आहेत, त्यामुळे मला त्याच्याबरोबर चित्रपट सुरू करु दे आणि आमिरनेही त्यासाठी होकार दिला.”

शाहरुखने काजोलसाठी शिफारस केली

“शाहरुख खानने काजोलच्या अभिनयाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यामुळेच मी तिला चित्रपटात घेतलं”, असे राकेश रोशन यांनी सांगितले. काजोल, शाहरुख आणि सलमान यांच्या मैत्रीबद्दल राकेश रोशन यांनी सांगितले की, “त्या काळी व्हॅनिटी व्हॅन्स नव्हत्या, सगळे कलाकार एकत्र बसून गप्पा मारत आणि जेवण करत असत. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे काम करत होतो.”

हेही वाचा…‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”

राकेश रोशन यांनी याच मुलाखतीत सांगितले की, “चित्रपटाची घोषणा करताच माझ्या दोन वितरकांनी साथ सोडली. त्यांच्या मते दोन रोमँटिक हिरोंना ॲक्शन चित्रपटात घेणे योग्य ठरणार नव्हते. पण, मी माझ्या गोष्टीवर ठाम राहिलो. माझ्या टीमपेक्षा प्रेक्षकांनी चित्रपटावर जास्त प्रेम केले, हेच त्याच्या यशाचे कारण आहे.”

‘कायनात’वरून ‘करण अर्जुन’

सुरुवातीला ‘करण अर्जुन’ सिनेमाचे नाव ‘कायनात’ असे ठेवण्यात आले होते, पण नंतर सर्वांनी चर्चा करून ‘करण अर्जुन’ असे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला, जे प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटले.

हेही वाचा…Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल

पुन्हा दोन सुपरस्टार्स एका चित्रपटात?

आजच्या काळात शाहरुख आणि सलमानसारख्या सुपरस्टार्सला एकत्र आणणे शक्य आहे का, या प्रश्नावर राकेश रोशन म्हणाले, “जर दोघांच्या भूमिकांना समान महत्त्व असलेली पटकथा असेल तर ते नक्कीच होऊ शकतं. मी ‘करण अर्जुन’मध्ये सलमान आणि शाहरुखच्या भूमिकांना सामान महत्त्व असणारी पटकथा लिहिली होती.” २२ नोव्हेंबर २०२४ ला ‘करण अर्जुन’ चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये झळकणार असून, प्रेक्षकांना या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे.

Story img Loader